भाजपवासी झालेल्या बबनराव घोलप यांची वादग्रस्त कारकिर्द…
सुधाकर बडगुजर यांच्यासोबतच नाशिकचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान बडगुजर यांच्यावर तर फक्त आरोप केले जात होते मात्र बबनराव घोलप यांची कारकीर्दच वादग्रस्त असून घोलप यांना न्यायालयाने एका भ्रष्टाचार प्रकरणात चक्क दोषीच ठरवले होते, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घोलप यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते.
काय होते प्रकरण ?
शिवसेनेच्या बबनराव घोलप यांना 1995 ते 1999 या काळात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात समाज कल्याण मंत्री म्हणून स्थान देण्यात आले होते. याच काळात बबनराव घोलप यांच्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते, घोलप यांना मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता
ज्ञात स्त्रोताच्या 190% अधिक संपत्ती गोळा केली असा ठपका बबनराव घोलप आणि त्यांच्या पत्नीवर ठेवण्यात आला होता. तब्बल 13 वर्ष हा खटला सुरू होता आणि अखेर घोलप दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवले होते. 2014 साली बबनराव घोलप यांना शिर्डी लोकसभेतून शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती मात्र न्यायालयाने दोषी ठरवल्याने त्यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली होती.
शिवसेनेच्या बबनराव घोलप यांना 1995 ते 1999 या काळात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात समाज कल्याण मंत्री म्हणून स्थान देण्यात आले होते. याच काळात बबनराव घोलप यांच्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते, घोलप यांना मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. ज्ञात स्त्रोताच्या 190% अधिक संपत्ती गोळा केली असा ठपका बबनराव घोलप आणि त्यांच्या पत्नीवर ठेवण्यात आला होता
दरम्यान, तब्बल 13 वर्ष हा खटला सुरू होता आणि अखेर घोलप दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवले होते. 2014 साली बबनराव घोलप यांना शिर्डी लोकसभेतून शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती मात्र न्यायालयाने दोषी ठरवल्याने त्यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली होती.
