कर्करोगग्रस्त आजीला नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दिलं फेकून…
घरात कोणी आजारी असेल तर आपण त्याची शुषुश्रा करतो. त्या व्यक्ती हवं नको ते सर्व पाहतो. मात्र मुंबईतील या नातवाने आपल्या सख्ख्या आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार पाहून माणुसकी ओशाळली असंच म्हणावं लागेल. या घटनेनंतर कुटुंबाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी आरे कॉलनीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका दुर्बल वृद्ध महिलेला आढळून आली. कचरा आणि प्लास्टिकमध्ये मरण्यासन्न अवस्थेत असलेल्या या महिलेला तिच्याच नातवाने फेकून दिले होते.
आरे कॉलनीतील युनिट क्रमांक 32 कडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी 8.30 च्या सुमारास ही घटना घडली. पोलीस नियंत्रण कक्षाला मिळालेल्या माहितीनुसार, आरे पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांना 60 ते 70 वयोगटातील ही महिला सडलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात असहाय्य अवस्थेत आढळली. तिने गुलाबी रंगाचा नाईटड्रेस आणि राखाडी रंगाचा पेटीकोट परिधान केला होता.
तिच्या चेहऱ्यावर एक जळजळणारी, उपचार न केलेली जखम होती, जी कदाचित एखाद्या गंभीर प्रकारच्या त्वचेच्या कर्करोगामुळे झाली असावी असा अंदाज आहे तिचे गाल आणि नाकावर जखमा दिसत होत्या. महिलेला त्वचेचा कर्करोग असल्याचं सांगितलं जात आहे.
स्वत:च्याच नातवाने फेकलं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात…
मिळालेल्या माहितीनुसार, त्वचेचा कॅन्सर असल्याने तिच्या नातवाने स्वत:च्याच आजीला आरेमधल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 60 वर्षीय वयोवृद्ध आजीला नातू कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून निघून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच या महिलेला पोलिसानी रुग्णालयात दाखल केल असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. यशोदा गायकवाड असे या वृद्ध महिलेचे नाव असून तिच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यशोदा गायकवाड या त्यांच्या नातवासोबत मालाड परिसरात राहतात, अशी माहिती त्यानी पोलिसांना दिली असून पोलीस त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत.
रुग्णालयांनी दिला उपचारापासून नकार…
कॉन्स्टेबल राठोड आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल निकिता कोळेकर यांनी महिलेला ताबडतोब पोलीस व्हॅनमध्ये बसवले आणि तिला जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयात नेले. रुग्णालयाने सुविधांचा अभाव असल्याचे कारण देत तिला दाखल करण्यास नकार दिला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तिला कूपर रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी पुन्हा एकदा उपचार नाकारले आणि तिला चांगल्या सुसज्ज रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.
महिलेची प्रकृती बिघडत असताना आणि कोणतेही रुग्णालय तिला दाखल करण्यास तयार नसल्याने, पोलिसांनी प्रयत्न सुरू ठेवले. जवळजवळ आठ तासांनंतर, संध्याकाळी 5.30 च्या सुमारास, कूपर रुग्णालयाने तिला दाखल करण्यास तयार झाले. वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी वैयक्तिकरित्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी समन्वय साधला तर दोन्ही कॉन्स्टेबल संपूर्ण परिस्थितीत तिच्या शेजारी राहिले.
