अनिल देशमुखांचा धक्कादायक दावा !
उद्धव सेनेचे नेते आमदार भास्कर जाधव नाराज आहेत. पक्षातूनच त्यांचे खच्चीकरणे केले जात असल्याचे सांगण्यात येते. यामुळे ते पक्ष सोडूण जाणार असल्याचेही बोलले जात आहे. यातच त्यांनी शरद पवार यांना सोडले ही मोठी चूक झाली अशी खंत व्यक्त केली आहे.
हे बघता ते पुन्हा राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) म्हणाले, असे अनेक नेते आहेत, ते जेव्हा खासगीत भेटतात तेव्हा खंत व्यक्त करतात. हे सांगून त्यांनी अजित पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांचीही हीच भावना असल्याचा दावा केला.
शरद पवार यांना सोडणे आमची मजबुरी होती. विपरित परिस्थिती असल्याने हा निर्णय घ्यावा असे अनेक नेते जेव्हा खासगीत भेटतात तेव्हा सांगतात. यात अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असल्याचा दावाही देशमुख यांनी केला. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आमचेच आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील की नाही हे मला माहीत नाही.
अजित पवार यांच्यासोबत 40 आमदारांनी शरद पवारांना सोडून निघून गेले. ते सध्या महायुतीच्या सत्तेत आहे. मात्र यापैकी सर्वच खुश असल्याचे दिसत नाही असेही अनिल देशमुख यांनी सांगितले. विशेष म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रादी काँग्रेसचा एकही उमेदवार निवडूण आलेला नाही. अनेक दिग्गज नेते पराभूत झाले आहे.
याउलट अजित पवार यांनी विदर्भात एकूण सात उमेदवार उभे केले होते. त्यापैकी सहाजण निवडून आले आहेत. सध्या पेरण्यांचा मोसम आहे. रासायकनिक व मिश्र खंतांचा तुटवडा आहे. पाहिजे त्या प्रमाणात पुवरठा झालेला नाही.
डीएपीच्या मागण्याच्या तुलनेत फक्त 30 टक्केच पुरवठा आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी अडचणीत असल्याने ही कर्जमाफीसाठी योग्य वेळ आहे. सरकारने यासाठी निवडणुकीची वाट बघू नये, असा टोलाही अनिल देशमुख यांनी लगावला.
