दैनिक चालु वार्ता माळशिरस प्रतिनिधी -प्रा विजय गेंड
माळीनगर ता माळशिरस येथे श्री संत सेना महाराज मंदिराच्या सभामंडपाच्या भूमिपूजनाचा समारंभ शुभारंभ माळशिरस विधानसभेचे माजी आमदार श्री राम सातपुते यांच्या शुभहस्ते पार पडला
श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम असलेल्या या सभामंडपामुळे भाविक भक्त आणि माळीनगर ग्रामस्थांना येणाऱ्या काळात अधिक सुसज्ज व श्रद्धापूर्ण वातावरण या सभागृहाच्या माध्यमातून लाभेल श्री संत सेना महाराज यांचा आदर्श जीवनमार्ग हा भक्ती, समर्पण आणि समाजप्रबोधनाचा आहे. त्यांच्या विचारांना समर्पित असा हा सभामंडप ग्रामस्थांसाठी धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यांचा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांसमोर माजी आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केला.
यावेळी माळीनगर कारखान्याचे चेअरमन रंजन भाऊ गिरमे, महात्मा फुले पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन महादेव अण्णा एकतपुरे, निखिल कुदळे, अकलूज मंडलाध्यक्ष सुजय भैय्या माने पाटील, लक्ष्मण डोईफोडे, किरण भांगे, अमोल गिरमे, सचिन शिंदे, सोनू भैय्या पराडे पाटील, अमित टिळेकर, जनक ताम्हाणे, आण्णासाहेब शिंदे, उपसरपंच अतुल कांबळे, निलेश एकतपुरे, राहुल रोकडे, मेजर जाधव, सुधीर भाऊ गाडेकर, किरणजी भांगे, योगेश जाधव, महादेव पवार, पप्पू सूर्यवंशी, हजारे समाधान राऊत, धनेश डांगे, गणेश डांगे, रामेश्वर गवळी, नानासाहेब साळुंखे, पप्पू चौधरी, समाधान आलमे, गोरख डांगे, शिवाजी गवळी, लक्ष्मण राऊत, तात्या राऊत, संजय राऊत, अभिजीत डांगे, अर्जुन गायकवाड, किरण गवळी, नवनाथ जाधव, सोनू राऊत, रिंकू राऊत, अभिमान जगताप, संग्राम भोसले, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नाभिक समाज बांधव उपस्थित होते.
