दैनिक चालु वार्ता जेजुरी प्रतिनिधी – संदीप रोमन
पुरंदर जेजुरी : धार्मिक आद्यात्मिक सामाजिक आणि शैक्षणिक जीवन मूल्यांचे महत्व सांगणारी आणि संत साहित्याची परिक्रमा असणाऱ्या बहुरंगी बहूढंगी लोकरंगातील पंढरीच्या वारीत विशेष लक्षवेधी ठरलेल्या साक्षरता दिंडीच्यावारीचे प्रचार प्रसार करण्याचे कामकाज स्वयंसेवक नागसेन साबळे यांनी *जेजुरी नगरीत नंदी चौक* येथे उपस्तिथ वारकरी ग्रामस्थांचें विशेष प्रबोधन *कठ पुतळी गीत नृत्य* सादर करून केले.
केंद्र सरकार पुरस्कृत उल्लास नवं भारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत दर वर्षी साक्षरता दिंडीचे आयोजन केले जाते.
दोन्ही पालखी मार्गांवर पंढरी वारीत साक्षरता रथ प्रचार प्रसार करीत आहे,यंदाच्या *कठ पुतळी नृत्य अविष्कार* वारकरी ग्रामस्थांना चांगलाच भावला.यात नागसेन यांच्या सह हुमायू मोरे, करुणा साबळे, उन्नती साबळे, भारती भगत दीपक भुजबळ,सोनाली चव्हाण, दीपक बडगुजर,अनंत पोकळे, राजू जगगे यांनी सहभाग घेतला होता जेजुरी च्या खंडोबा मंदिर मुख्य प्रवेशद्वार नंदी चौक येथे सुवर्णस्टार मित्र मंडळ आणि जिजामाता हायस्कुल अँड जुनिअर कॉलेज यांनी आयोजन केले होते. या प्रसारित कार्यक्रमात विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार सागर, सुवर्णस्टार मित्र मंडळ अध्यक्ष रज्जाकभाई तांबोळी मुख्याध्यपीका गायत्री बेलसरे, पर्यवेक्षक सतीश पिसाळ प्रसिद्ध तबला वादक अमोल बेलसरे, सोमनाथ उबाळे आणि शिक्षक वर्ग उपस्तिथ होता, यात वारकऱ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी बाहुली नृत्य गीत नाट्य, पथ नाट्य साक्षरता घोषणा गीते, छत्री टोप्या वाटप विशेषतः असाक्षरांची ऑनलाईन ऑफलाईन नोंदणी इत्यादी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले पायी वारीत शिक्षकांनी असाक्षर वारकऱ्यांचे प्रबोधनही केले. सदर वारीचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त सच्छिन्द्र प्रताप सिहं यांच्या हस्ते पुणे येथून झाले महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे चे रेखावर संचालक डॉ महेश पालकर तसेच शिक्षण संचालनालय योजनेचे संचालक कृष्णकुमार पाटील आणि बालभारती पुणे यावेळी उपस्तिथ होते.
जेजुरी नगरीतील या साक्षरते च्या वारीत सुववर्णस्टार चे कार्यकर्ते प्रीतम बारभाई, राजेश बारभाई यांनी परिश्रम घेतले यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्तिथ होते. शासनाच्या या कठ पुतळा नृत्य गीत प्रयोगाने मात्र असाक्षरता मात्र साक्षरते चा धडा शिकत आहे एवढं मात्र खर याचे दर्शन झाले.
