दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनीधी – लक्ष्मण कांबळे
उस्माननगर पोलीस्टेशन अंतर्गत येणारे उस्माननगर या गावातील १६ वर्षाची मुलगी रागाच्या भरात दि.२६ जून रोजी सकाळी ०७. ३० वाजता घरातून निघून गेल्यावर आईने सगळीकडे शोधाशोध केली मुलगी कोठेही सापडली नसल्याने मुलीच्या आईने उस्माननगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली सदर फिर्याद पोलीस ठाणे अंमलदार सहा.पोलीस उपनिरीक्षक श्री मस्के यांनी नोंदवून ठाणे प्राभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांना माहीती दिली . वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संजय निलपत्रेवार सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो.स्टे. उस्माननगर ,गजानन गाडेकर पोलीस उपनिरीक्षक, सुनिल सुर्यंशी पोउपनिरीक्षक , वडजे पो.हे.काॅ. ,डोळे व सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, पो.हे.काॅ. सिटीकर यांच्या मदतिने लोकेशन प्राप्त करून सदर लोकेशनवर पोलीस उपनिरीक्षक गाडेकर, पोहेका वडजे ,पोहेका डोळे यांना मुलीच्या आईसह पाठवून दिले असता सदर लोकेशनच्या आधारे क्रांती चौक , सिडको नांदेड याठिकाणी मुलगी मिळाली त्या मुलीस सुखरूप रित्या तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले.पोलीसांनी लगेच चक्र फिरविल्याने अल्पवयीन मुलीला कोठे ही जिल्ह्याच्या बाहेर जाता आले नाही व कोणताही अनुचित प्रकार घडण्याआगोदर तिला सुखरूप ताब्यात घेवून अर्ध्या तासात आईच्या ताब्यात दिले आहे. उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार नांदेड यांनी उस्माननगर पोलीसांचे कौतुक केले आहे. व उस्माननगर गावक-यांच्या वतिने उस्माननगर पोलीस स्टेशन चे कौतुक होत आहे.
