दैनिक चालु वार्ता जेजुरी प्रतिनिधी:संदिप रोमण
पुरंदर जेजुरी : पुरंदर तालुक्यातील जयाद्रीची जीवनवाहिनी आणि साक्षात मल्हारी मार्तंडाची पवित्र कऱ्हामाई नदीच्या पूजना करिता गुरुवारी गाव सारा जमा झाला होता, संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत तीर्थक्षेत्र जेजुरी येथील कुलदेवता मल्हारी मार्तंड मूर्ती स्नानाची पवित्र कऱ्हा नदी नुकत्याच झालेल्या पर्जन्यवृष्टी मुळे खळखळून भरून वाहू लागल्याने जेजुरी ग्रामस्थ खांदेकरी,मानकरी,गावकऱ्यांसह मंदिर संस्कृती उपासक गुरव, ब्राम्हण,पुजारी,वीर,कोळी,घडशी असे अठरा पगड जाती धर्माचे लोक कऱ्हामाईच्या आरती पूजनाला उपस्तिथ होते.
यावेळी कऱ्हा माईचे विधिवत पूजन बेलसरे,खाडे, सेवेकरी यांनी केले याकरिता खांदेकरी, मानकरी, जालिंदर खोमणे आणि देवस्थान विश्वस्त मंगेश घोणे सपत्नीक यांच्या हस्ते पूजन करून ओटी भरण्यात आली. या प्रसंगी जेजुरी जेजुरी नगरपरिषद मुख्यधिकारी चारुदत्त इंगोले, भाजपा शहर अध्यक्ष सचिन पेशवे, माजी विश्वस्त सुधीर गोडसे, संदिप जगताप, मानकरी राजाभाऊ पेशवे, माजी नगरसेवक सतीश गाडगे,सुशील राऊत,शिवसेना शहर प्रमुख विठ्ठल सोनवणे, ग्रामस्थ गणेश आगलावे दीपक राऊत,माणिक पवार, छबन कुदळे, दिलीप आगलावे, किसन कुदळे,ओम बारभाई,मोरे, खोमणे, राऊत , माळवदकर पाटील इत्यादी मान्यवर उपस्तिथ होते.
यंदा उन्हाळ्यातच पावसाने हजेरी लावल्या मुळे पंचक्रोशीतील नदी नाले ओढे बंधारे भरभरून वाहून कऱ्हा नदी वरील मल्हारसागर धरणास मिळाले आहेत यामुळे मल्हारसागर धरण तुडुंब भरून वाहत आहे.
