शरद पवारांनी स्पष्टच सांगितले; संभाजी महाराज…
भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यांनी आपली भूमिका मांडताना म्हटले होते की, बाजीराव पेशवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या स्वराज्याचा भव्य विस्तार केला.
शनिवारवाडा हे त्यांच्या पराक्रमाचे आणि स्वराज्याच्या वैभवाचे प्रतीक आहे. पुणे हे त्या काळात स्वराज्याचे प्रमुख केंद्र होते. त्यामुळे पुणे रेल्वेस्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावं, ही आमची स्पष्ट आणि योग्य अशी मागणी आहे.
मेधा कुलकर्णींच्या या मागणीबाबत कोल्हापूर दौऱ्यावर असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘मला असं वाटतं कारण नसताना आपण वाद करू नये. बाजीराव पेशव्यांच नाव द्या, हा अग्रह का केला आहे हे मला समजत नाही. शौर्य हा जर क्राइटेरीया असेल तर अनेकांच नाव देता येईल. संभाजी महाराजांकडे शौर्य नव्हतं? संभाजी महाराजांकडे त्याग ही होता आणि शौर्यही होतं. त्यामुळे कारण नसताना समाजा समजामध्ये आंतर वाढवायचा उद्योग काही लोक करतात आणि त्यातला तो प्रकार आहे.
महाविकास आघाडीतून महायुतीत होत असलेल्या इन्कमिंगबद्दल देखील शरद पवारांनी भाष्य केले. ते म्हणाले, महाविकास आघाडीतून जे जातात त्यांचं काय होत ते पहावं लागेल. तिकडे आधीच गर्दी आहे. त्यांना तिकडे किती संधी मिळते ते पाहावं. त्यांनी तिकडे निवांत राहावं. ते तिकडे गेलेत म्हणजे शांता बसणार नाहीत. त्यामुळे त्याचा फायदा महाविकास आघाडी म्हणून आम्ही कसा घ्यायचा ते आम्ही पाहू.
हिंदी सक्तीला विरोध
पहिलीपासून हिंदीची अभ्यासक्रमात अंमलबजावणी करण्यास शरद पवारांनी विरोध दर्शवला, ते म्हणाले, पहिली ते चौथी हिंदी सक्तीची गरज नाही. या विद्यार्थ्यांना मातृभाषा शिकवण्याची गरज त्यावेळी असते. पण पाचवी पासून पुढे हिंदी येणं गरजेचं आहे. हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नसल्याचेही पवार यांनी म्हटले
ठाकरेंच्या मोर्चात सहभागी होणार?
राज ठाकरे यांनी पाच जुलैला मोर्चाचे आयोजिन केले आहे. सर्व राजकीय पक्षांनी त्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, याबाबात मी वाचले आहे. त्यांनी मोर्चात सहभागी व्हा असं म्हटलं आहे, त्यांचे भाष्य समजून घेतलं पाहिजे. तुम्ही सहभागी व्हा म्हटल्यावर होता येत असे नाही, भूमिका समजून घ्यावी लागेल. महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय असतील तर भूमिका घेतली जाईल.
