दैनिक चालू वार्ता माजलगांव प्रतिनिधि -नाजेर कुरेशी.
माजलगांव शहराचा विस्तार होत आहे. माजलगांव शहरामध्ये महेबूबनगर है वार्ड दहा बारा वर्षाने पुढे होत आहे वार्ड नविन असल्याने या वार्डात खुप मोठी लोकसंख्या आहे. या वार्डात १ ही अंगणवाडी नाही सदरील विद्यार्थीने ईतर वार्डाच्या अंगणवाडी साठी अर्ज केले होते परंतू त्यानी सांगीतले कि आमच्या कडे पुर्ण संख्या भरलेली आहे आमच्याकडे जागा शिल्लक नाही. त्या कारनाने आम्ही ह्या विद्यार्थाचे प्रवेश घेऊ शकत नाही तुमच्या वार्डात टाका असे प्रती उत्तर देत आहे.
तरी या विद्यार्थाचे आतोनात नुकसान होत आहे व विद्यार्थी शिक्षण पासुन वंचीत राहत आहे. पत्रकार यांनी दि. २५/०७/२०२३ रोजी माजलगाव उपविभागीय कार्यालय समोर मुले बाळा सह शाळा भरविण्यात आली होती व उपोषण करण्यात आले होते परंतु त्या निवेदन उपोषणाला टाळा-टाळ करण्यात आली आहे व वार्डात नविन अंगणवाडी देण्यात आली नाही.
संबंधित बालविकास अधिकारी यांनी माजलगांव येथे महेबूबनगर वार्डात अंगणवाडी मंजूर करूण द्यावी असे चालू वार्ताचे पत्रकार नाजेर कुरेशी यानी
आयुक्त साहेब औरंगाबाद यांना पोस्टाव्दारे कळविले आहे.
