दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : वाघोली शहरात उघड्या गटारी, गटारीच्या झाकणाची दुरावस्था व तुटलेल्या झाकणांची स्थिती बद्दल दैनिक चालू वार्ताने पुढील संभाव्य होणाऱ्या धोक्याबाबत सविस्तर वृत्त मांडल्यानंतर पुणे महानगरपालिकेने तात्काळ चेंबरला नवीन झाकण बसवून दुरुस्ती केली आहे.मुख्य म्हणजे झाकणे तुटलेली गटारे पुणे – अहिल्यानगर वाहतुकीच्या मार्गावर होती. त्यामुळे या मार्गांवरून विद्यार्थ्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे एखादा विद्यार्थी गटारामध्ये पडून अपघात होण्याची शक्यता होती.
तसेच मुख्य रस्त्यांवर सकाळ संध्याकाळ ते रात्री उशिरापर्यंत सतत वाहतूक सुरू असल्यामुळे पायी किंवा सायकलने जाणारे विद्यार्थी याच मार्गांचा वापर करतात. मात्र या मुख्य रस्त्यांवर असलेल्या भूमिगत गटारांवर सिमेंटचे अथवा पत्र्याचे झाकण तुटून दुरावस्था झाल्यामुळे अपघाताचे धोके वाढले होते.
वाघोली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पुढील भागात रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारीचे झाकण निघालेल्या झाकणाची दैनिक चालू वार्ताच्या वृत्तांनंतर तात्काळ महानगरपालिकेने दुरुस्ती केल्यामुळे नागरिक व प्रवाशी समाधान व्यक्त करत दैनिक चालू वार्ताचे आभार मानत आहेत.
झाकणे बदलायला इतका उशीर का? या मथळ्याखाली छापली होती बातमी..
महानगरपालिकेला काम तर करावेच लागणार आहे. पण ज्या ठिकाणी तत्परता दाखवायची त्या ठिकाणी दाखवली जात नसल्यामुळे नागरिकांत नाराजीचा सुरु आहे. अपघात घडायच्या आधी अशा गोष्टी मार्गी लागल्या पाहिजे अशी माफक अपेक्षा नागरिकांची आहे. तेव्हा अशा संभाव्य धोकेदायक गोष्टीना महानगरपालिकेने प्राधान्य दयावे असे नागरिक बोलत आहेत.
दैनिक चालू वार्ता कायमच सामाजिक प्रश्नांसाठी अग्रेसर..
दैनिक चालू वार्ताने वेळोवेळी सामाजिक प्रश्नांसाठी वाघोलीकरांसाठी आवाज उठविला आहे.अत्यंत बारकाईने काम करत अन्यायाला वाचा फोडण्याचे काम दैनिक चालू वार्ता करत आहेत असे मत आभार व्यक्त करताना नागरिक करत आहेत.

