दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा- सुरेश ज्ञा. दवणे
जालना (मंठा)
केहाळ वडगाव मार्गे जाणारी मंठा ते वझर सरकटे दरम्यान पूर्वी सुरु असलेली एस.टी. बस सेवा गेल्या दोन वर्षांपासून बंद असून ही सेवा तातडीने पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे मंठा तालुका संघटक तुळशीराम कुहिरे यांनी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली वझर सरकटे परिसरातील ग्रामस्थांनी एस.टी. महामंडळाकडे निवेदन द्वारे मागणी करणार आहेत
पूर्वी मंठा, ढोकसाळ, नायगाव, केहाळ वडगाव,माळेगाव,जयपूर,एरंडेश्वर बेलोरा चौफुली मार्गे वझर सरकटे ही बस सेवा नियमित सुरू होती. मात्र, मागील दोन वर्षांपासून ती सेवा बंद आहे. याचा फटका प्रामुख्याने ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व शासकीय कामासाठी मंठा शहरात जाणाऱ्यांना बसतो आहे. शाळा, महाविद्यालये, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, कोर्ट आदी ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक बोजाही वाढत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही बस सेवा म्हणजे एकमेव सुरक्षित व परवडणारा प्रवासाचा मार्ग होता. त्यामुळे एस.टी. महामंडळाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन मंठा ते वझर सरकटे बससेवा तातडीने सुरु करावी, अशी जोरदार मागणी कुहिरे आणि ग्रामस्थांनी केली आहे.
🎆
विद्यार्थ्यांना”महाविद्यालयीन शिक्षणासाठी शेतकऱ्यांना पंचायत समिती, तहसीलसह सरकारी कामासाठी रोज मंठ्याला जायचं असतं. खाजगी वाहनांचा खर्च परवडत नाही. बस सुरू झाली तर गरीब विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल.”हा सर्वसामान्यांच्या हक्काचा प्रश्न आहे. बससेवा ही सुविधा नसून गरज आहे. एस.टी. महामंडळाने तातडीने ही सेवा पुन्हा सुरू करावी ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये या सेवेबाबत अपेक्षा असून शासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जावा,
तुळशीराम कुहिरे,शिवसेना तालुका संघटक,मंठा
