दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी-एकनाथ गाडीवान
देगलूर. तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय येथे पार पडलेल्या जिल्हा नियोजन विकास समितीच्या, (DPDC) बैठकीत आमदार जितेश अंतापुरकर यांनी घेतलेल्या तंबीची दखल प्रशासनाने घेतले असून, गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रतिनियुक्तीच्या विषयाला आता मूर्त स्वरूप मिळाले आहे. देगलूर उपजिल्हा रुग्णालयातील काही कर्मचारी प्रतिनियुक्तीवर कार्यरत असल्यामुळे, स्थानिक आरोग्य सेवा कर्मचारी अभावी विस्कळीत होण्याची शक्यता होती. ही बाब गंभीर असल्याने,सदर प्रतिनियुक्ती तत्काळ रद्द करण्यात यावी.अशी सूचना अंतापुरकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना केली होती. या सूचनेनुसार,प्रशासनाने त्वरित कारवाई करत प्रतिनियुक्ती रद्द केली असून संबंधित अधिकाऱ्यांना मूळ पदस्थापनेचा उपजिल्हा रुग्णालयात त्वरित रुजू होण्याचे आदेश केले आहेत. या निर्णयामुळे देगलूर परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होणार असून सेवांचे गुणवत्ता सुधारणा असे मदत होणार आहे.
