दैनिक चालू वार्ता माळशिरस प्रतिनिधी – राजेंद्र पिसे
नातेपुते (ता. माळशिरस) – संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सोमवार, दिनांक ३० जून रोजी नातेपुते येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध सामाजिक संस्था, तरुण मंडळे, सहकारी संस्था व प्रतिष्ठान यांनी वारकऱ्यांसाठी विविध सेवाकार्यांची योजना केली होती.
वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, नाश्ता, भोजन तसेच चहा व बिस्किट वाटप करण्यात आले. त्यासाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेतला.
नातेपुते एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संचलित डॉ. ब. ज. दाते प्रशाला, प्राथमिक विभाग व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत हजारो वारकऱ्यांना चहा व बिस्किट वाटप करण्यात आले. यावेळी सेक्रेटरी शिवाजीराव पिसाळ, मुख्याध्यापक विनायक देशपांडे, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
श्री. दत्त प्रतिष्ठान नातेपुते यांच्या वतीनेही वारकऱ्यांसाठी लाडू, चिवडा व शुद्ध मिनरल वॉटर बाटल्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम डॉ. उराडे यांचे आशीर्वाद हॉस्पिटल समोर पार पडला. यावेळी अध्यक्ष प्रकाश पदमन, रविंद्र ठोंबरे, संजय चांगण, संजय मामा उराडे, कैलास सोनवणे, शक्ती पलंगे, नंदकुमार ढालपे, शिवम उराडे, रवी कोतमीरे, उमेश बरडकर, राहुल सोनवळे, विवेक ठोंबरे, सुमित चांगण यांनी सहभाग घेतला.
