
भुजबळांच्या गौप्यस्फोटाने राजकारण तापले…
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये दोन वर्षांपूर्वी मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जची घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेबद्दल एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘या लाठीचार्जच्या आधी मनोज जरांगे-पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) एका पराभूत आमदारासोबत बैठक झाली होती, आणि त्यात दगडफेक करण्याचा कट रचला गेला,’ असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे.
दोन वर्षांपूर्वी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जची घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. हा लाठीचार्ज होण्याआधी मनोज जरांगे-पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) एका आमदारासोबत बैठक झाली होती, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले भुजबळ?
गुरुवारी नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “अंतरवाली सराटीतील लाठीचार्जच्या आधी जरांगे आणि शरद पवारांच्या एका आमदारासोबत बैठक झाली. त्यात दगडफेक करण्यासंदर्भात कट रचला गेला.” भुजबळांनी त्या आमदाराचे नाव सांगितले नसले, तरी “त्या आमदाराचा पराभव झाला आहे,” असे सूचक विधान त्यांनी केले. भुजबळांच्या या दाव्यानंतर, राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
भुजबळांच्या या दाव्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना आव्हान दिलंय. “तो आमदार कोण? कुठे बैठक झाली? याचे पुरावे द्या,” असे आव्हान त्यांनी दिलं.
यावर प्रतिक्रिया देताना, खासदार सुप्रिया सुळे यांनी भुजबळांना आव्हान दिले आहे. “तो आमदार कोण? कुठे बैठक झाली? याचे पुरावे द्या,” असे त्या म्हणाल्या. यामुळे शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.
OBC नेत्याचा मोठा दावा
एकिकडे छगन भुजबळ यांनी पवारांच्या आमदारावर आरोप केले असताना, दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील या लाठीचार्जमागे राजेश टोपे यांचा हात असल्याचा दावा केला आहे. या विविध दाव्यांमुळे अंतरवाली सराटीतील घटनेतील नेमके दोषी कोण, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.