
अमेरिकेला झोंबल्या मिरच्या; थेट…
अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावून मोठा धक्का दिला. हेच नाही तर भारताने अमेरिकेच्या अटी मान्य कराव्यात नाही तर अजूनही काही निर्बंध लादले जातील असे सांगितले गेले. मात्र, भारताने शेवटपर्यंत अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाही.
अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर त्याचा थेट परिणाम काही उद्योगांवर झाला. मात्र, होणारे नुकसान भरून काढण्यासाठी भारताने आपला पुढचा प्लॅन तयार ठेवला. इतक्या मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावूनही भारतीय अर्थव्यवस्था स्थिर असल्याचे स्पष्टपणे बघायला मिळत असतानाच आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून भारतासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आल्याचे बघायला मिळत आहे.
अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारतासाठी जपानकडून आलेली बातमी अत्यंत दिलासादायक नक्कीच म्हणावी लागेल. जपानी रेटिंग एजन्सी रेटिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन इंकने भारताला क्रेडिट रेटिंग ‘BBB’ वरून ‘BBB+’ दिली. गेल्या वेळच्या तुलनेत यंदा टॅरिफनंतरही भारताच्या रेटिंगमध्ये मोठी सुधारना झालीये. रेटिंगनुसार, भारतीय अर्थव्यवस्थेला स्थिर रेटिंग देण्यात आली आहे. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारतीय अर्थव्यवस्था ढासळणार असे सांगितले जात होते. मात्र, टॅरिफच्या धक्क्यातही ती स्थिर आहे.
आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग एजन्सीने भारताचे रेटिंग अपग्रेड करण्याची ही तिसरी वेळ आहे. विशेष म्हणजे भारताला चांगली रेटिंग देखील मिळाली. अर्थ मंत्रालयाने देखील संशोधन आणि विकासाच्या निर्णयाचे स्वागत केले आणि म्हटले की पाच महिन्यांत तीन एजन्सींनी केलेले रेटिंग अपग्रेड हे भारताच्या मजबूत आर्थिक मूलभूत तत्त्वांच्या व्यवस्थापनाला जागतिक मान्यता मिळाल्याचे प्रमाण आहे.
भारतावर अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर लगेचच प्रशासनाने पर्यायी मार्ग शोधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपान दाैऱ्यावर गेले. एस. जयशंकर हे रशियाच्या दाैऱ्यावर गेले आणि काही महत्वाचे करार केले. जुलै आणि ऑगस्ट महिन्यापेक्षा अधिक सप्टेंबर महिन्यात भारताने रशियाकडून अधिक तेल खरेदी केले. हेच तेल भारताने रशियाकडून खरेदी करू नये, याकरिता अमेरिका भारतावर दबाब टाकत होती. अमेरिकेने स्पष्ट म्हटले की, भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, आम्ही त्यांच्यावरील 25 टक्के टॅरिफ काढू.