
पाकिस्तानने साैदी अरेबियासोबत मिळून संरक्षण करार केला. या संरक्षण करारानुसार, पाकिस्तानवर हल्ला म्हणजे साैदी अरेबियावर समजला जाईल. यासोबतच पाकिस्तान मोठी चाल खेळत असून काही मुस्लिम देशांसोबत अशाप्रकारचा करार करण्याच्या तयारीत आहे.
मात्र, साैदीसोबत संरक्षण करार करून भारतापेक्षा मोठा धक्का पाकिस्तानने अमेरिका आणि इस्त्रायलला दिलाय. या संरक्षण कराराच्या बदल्यात ते साैदी अरेबियाला थेट अणुकार्यक्रम पुरवू शकतात. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी यावर थेट भाष्य केले आहे.
कतारवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांचे हे विधान इस्रायलला इशारा म्हणून केल्याचे मत तज्ज्ञांचे आहे. त्यांनी स्पष्ट म्हटले की, अण्वस्त्र साैदी अरेबियापर्यंत पसरवली जातील. पाकिस्तानी मंत्र्यांचे हे विधान अमेरिका आणि इस्रायल दोघांनाही अत्यंत धोकादायक आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने मोठी धसकी घेतली असून काहीही करून मुस्लिम देश आपल्या बाजूंनी उभा करायची आहेत. पाकिस्तानी माध्यमाला मुलाखत देताना संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफने धक्कादायक खुलासा केला.
ख्वाजा आसिफने म्हटले की, आपल्याकडे जे आहे आणि आपण ज्या क्षमतेने निर्माण केले आहे अणू प्रकल्प त्याला भरपूर निधी मिळाला. असे म्हटले जाते की, पाकिस्तान आपला अणुकार्यक्रम विकसित करत होता, तेव्हा सौदी अरेबियाने त्यांना भरपूर निधी दिला. मध्य पूर्वेतील इस्रायल हा एकमेव अण्वस्त्रधारी देश मानला जात आहे. कतारमधील हमासच्या तळावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे अरब देशांमध्ये त्याच्या सुरक्षेबाबत नवीन चिंता निर्माण झाल्या आहेत.
त्यामध्येच इस्त्रायल आणि अमेरिकेचे टेन्शन पाकिस्तानने वाढवले असून जाहीरपणे सांगितले जात आहे की, आता साैदी अरेबियाला अणुकार्यक्रम पाकिस्तान पुरवणार आहे. फक्त हेच नाही तर साैदी अरेबियाने देखील पाकिस्तानसोबत त्यामुळे संरक्षण करार केला आहे. आता प्रश्न पडतो की, जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर खरोखरच साैदी अरेबिया देखील युद्धात प्रत्यक्षात उतरणार? मात्र, ही गोष्टी पक्की आहे की, साैदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या करारानंतर भारताची डोकेदुखी वाढली आहे. मात्र, भारताने स्पष्ट केले की,आमच्या देशाची सुरक्षा ही आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.