
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा; मंत्र्यांनाही दिले महत्त्वाचे आदेश…
सध्या राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बीड, मराठवाडा, अहिल्यानगर यांसह अनेक भागांना मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे.
त्यामुळे सर्वत्र पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक अडकले आहेत. सध्या प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरु आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पूरस्थितीची सविस्तर माहिती घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात कुठे अतिवृष्टी झाली आहे, कुठे पूर आला आहे, कोणत्या भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे, याबद्दलचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड आणि परभणी या भागात अतिवृष्टी झाली आहे. जवळपास यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले आहेत, अशी माहिती दिली.
सध्या इतका पाऊस पडलाय जो सरासरीच्या १०२ टक्के इतका आहे. काही भागत पूरस्थितीमुळे लोक अडकले आहेत. बीडमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. धाराशिवमध्येही रेस्क्यू ऑपरेशन सुरु असून २७ लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने एनडीआरएफने बाहेर काढलं. २०० लोकांना अजून वेगवेगळ्या सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे. सध्या आमच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्री हे तिथे पोहोचले आहेत. त्यांनी अतिरिक्त हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. त्याबद्दलही सध्या मी प्रयत्न करत आहेत.
विशेषत अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड आणि परभणी या भागात अतिवृष्टी झाली आहे. जवळपास यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले आहेत. आता एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १७ तुकड्या या त्या ठिकाणी काम करत आहेत. काही आठवड्यांपूर्वी आपण शेतकऱ्यांचे जे नुकसान झालं, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. यावेळी आपण जसे पंचनामे येतील, तशी मदत केली जाणार आहे. आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटींची मदत करण्याचे जीआर काढलेले आहेत.