
आशिया कप 2025 स्पर्धा सध्या चांगलीच चर्चेत असून रविवारी भारताने पाकिस्तानचा सुपर-4 मध्ये पुन्हा दारूण पराभव केला. हा सामना अनेक कारणांनी गाजला. त्यात अनेक वादही झाले.
पण पाकिस्तानचे खेळाडू, त्यांच्या चित्रविचित्र कृती यांची खूपच चर्चा झाली. सुपर-4 सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला. पण याच सामन्यादरम्यान पाकिस्तानचा खेळाडू, साहिबजादा फरहानच्या “गन सेलिब्रेशन” ची सर्वत्र चर्चा झाली. खरं तर, पाकिस्तानने प्रथम पलंदाजी केली, त्यावेळी अर्धशतक पूर्ण केल्यानंतर, फरहानने त्याची बॅट बंदुकीसारखी धरून त्याचं यश साजरं केलं. मात्र त्याच्या या कृतीवरून बरीच टीका झाली, अनेकांनी त्याला ट्रोलही केलं. आता साहिबजादा फरहान यानेच या गन सेलिब्रेशनवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला साहिबजादा फरहान ?
अर्धशतक झाल्यावर केलेल्या गन सेलिब्रेशनबद्दल साहिबाजादा पहिल्यांदाच बोलला.तो म्हणाला, (अर्धशतक झाल्यावर) माझ्या मनात आलं, म्हणून मी सेलिब्रेशन केलं. त्यावर लोकांची काय प्रतिक्रिया होती, ते काय बोलले यामृने मला काहीच फरक पडत नाही, असंही तो म्हणाला. माझी टीम आक्रमकपणे खेळावी, अशीच इच्आछ असल्याचेही त्याने बोलून दाखवलं.
गन सेलिब्रेशनचं कारण
” ते सेलिब्रेशन फक्त त्या क्षणात हरवून गेल्यामुळे झालं होतं. खरंतर 50 धावा केल्यावर, अर्धशतक केल्यावर मी असं सेलिब्रेशन करत नाही, पण तेव्हा माझ्या मनात अचानक विचार आला, की आज सेलिब्रेशन करावं. मग मी तसंच केलं. त्यावर लोकांची काय प्रतिक्रिया असेल याचा मी विचार केलाच नाही. लोकांच्या प्रतिक्रियेने, त्यांच्या बोलण्याने मला फरक पडत नाही ” असंह साहिबाजाने सांगितलं.
रविवारी झालेल्या सामन्यात साहिबजादा फरहानने पाकिस्तानला जलद सुरुवात करून दिली. त्याच्या 58 धावांच्या खेळीमुळे पाकिस्तानने 171 धावांच्या मोठं टार्गेट रचलं. पण, भारतातर्फे अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्या स्फोटक फलंदाजीमुळे भारताला सहज विजय मिळाला.
दरम्यान रविवारी झालेल्या सामन्यात साहिबजादा फरहान हा एकमेव पाकिस्तानी खेळाडू नव्हता, ज्याला त्याच्या हावभावांसाठी ट्रोल केले गेले. लढाऊ विमान नष्ट करण्याची ॲक्शन करणारा हारिस रौफ याच्यावरही बरीच टीका झाली. त्याच्यासमोरच कोहलीच्या नावाचजयघोष करत चाहत्यांनी त्याला त्याची जागा दाखवून दिली.