
पाकिस्तानचे पंतप्रधान गेटवर ताटकाळात; व्हाईट हाऊसमध्ये…
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला अडचणीत आणण्यासाठी तब्बल 50 टक्के टॅरिफ भारतावर लावला. फक्त हेच नाही तर पाकिस्तानसोबतच बांगलादेशालाही डोनाल्ड ट्रम्प हाताशी पकडत आहेत. नुकतात डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी गेलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांची चांगलीच फजिती झाली.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. मात्र, यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवली. शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये शहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. शहबाज शरीफ हे असीम मुनीरसह डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी व्हाईट हाऊसच्या गेटवर वाट पाहावी लागली.
डोनाल्ड ट्रम्प बिझी असल्याने त्यांना काही वेळ व्हाईट हाऊसच्या गेटवर त्यांची वाट पाहत ताटकळत थांबावे लागले. कारण त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प एका महत्त्वाच्या करारात व्यस्त होते. शहबाज शरीफ आणि असीम मुनीर व्हाईट हाऊसच्या दारात उभे असताना, ट्रम्प टिकटॉकबाबतच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करत होते. हेच नाही तर त्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद देखील साधला. डोनाल्ड ट्रम्प यांना निरोप देण्यात आला शहबाज शरीफ यांना असीम मुनीर थांबले.
बऱ्याच वेळानंतर डोनाल्ड ट्रम्प हे शहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांनी भेटण्यासाठी आले. काहीवेळ तिघांमध्ये चर्चा देखील झाली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी चर्चा केली. ट्रम्प आणि शहबाज शरीफ यांच्यातील ही भेट अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात काहीतरी तयार होत असल्याचे संकेत देते. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत जवळीकता वाढवली आहे.
हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबियांनी पाकिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक केल्याचेही सांगितले जाते. त्यामध्येच आता शहबाज शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आौषध कंपन्यांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानमध्ये काहीतरी खिचडी शिजत असल्याचे दिसत आहे. मात्र, यावर भारताने सावधानतेची भूमिका घेतली आहे.