प्रचंड संतापल्या; थेट म्हणाल्या कायद्याचे…
सातारा येथील डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. हातावर शेवटची नोट लिहित डॉ. संपदा मुंडे यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. याप्रकरणी PSI गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे… गुरुवारी रात्री त्यांनी टोकाचं पाऊल उचलत एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. यावर सुषमा अंधारे आणि शंभूराज देसाई यांनी तिव्र संताप व्यक्त केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे
ही घटना धक्कादायक म्हणण्यापेक्षा अतिशय गंभीर आणि दुर्दैवी आहे… एखाद्या व्यक्तीला इतकं टॉर्चेर केलं जातं आहे आणि तीन महिन्यांपासून कोणतीच मदत उपलब्ध होत नाही…. मदत उपलब्ध झाली असती तर, जे अघटीत पाऊल डॉक्टर तरुणीने उचललं आहे, ते उचललं गेलं नसतं… आत्महत्या हा काही पर्याय असू शकत नाही.. हे आपल्यासाठी म्हणणं सोपं आहे आणि तो असू ही शकत नाही हे देखील बरोबर आहे..
पुढे सुषमा अंधारे म्हणाल्या, कामाच्या ठिकाणी असणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? त्या जबाबदारीबद्दल काहीच बोललं जात नाही. आता कदाचित चौकश्या होतोल पोस्टमार्टम होईल… तारखेवर तारखा पडत राहतील, पण मुळ मुद्दा मात्र तसाच राहील… कायद्याचे रक्षकच जर भक्षक होत आहेत. डॉक्टर तरुणीचा बळी जाण्याचं कारण कायद्याचे रक्षक असतील तर दाद कोणाकडे मागायची.. असा प्रश्न देखील शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई
जेव्हा मला घटनेबद्दल माहिती मिळाली तेव्हा मी ताबडतोब एसपी आणि ऍडिशनल एसपी यांच्याबरोबर बोललो आहे. सगळे पुरावे हाती यावे या दृष्टीने कारवाईची सुरुवात केली आहे. अटक सत्र सुरु करण्याचे देखील आदेश दिले आहेत. पोलीस देखील त्याच कामाला लागले आहे. ज्या कोणाचं नाव समोर आलं आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे, पण सर्व पुरावे ताब्यात घेऊन अटक प्रक्रिया सुरु करण्यास सांगितलं आहे. नराधमावर कारवाई करण्याच्या सर्व सूचना मी दिल्या आहेत. सध्या याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.
गृह (ग्रामीण) राज्यमंत्री पंकज भोयर
फलटण येथील उपजिल्हा कार्यालयातील महिलेने आत्महत्या केली आहे. सुसाईड नोट सापडली आहे दोन पोलिस आधिकाऱ्यांची नावे आहेत. सातारा पोलिस अधिक्षक यांच्याशी फोनवरून चर्चा झाली असून तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. या घटनेत जो कोणी सहभागी असेल त्याच्यावर कारवाई होईल… जो अहवाल येईल त्यात ज्या कोणाचा सहभाग असेल कारवाई होईल… असं वक्तव्य गृह (ग्रामीण) राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केलं आहे.


