नांदेड / गोविंद पवार
लोहा : – लोहा तालुक्यातील पांगरी येथे आई काळंकाई माता मंदीराच्या शेजारी श्री महादेव मंदिर व श्री संत कोंडजी बापु महाराज मंदिराचा भव्य भुमीपुजन सोहळा उद्या दिनांक 14-02-2026 शनिवार रोजी सकाळी 8:21 मिनिटांनी नांदेडचे खा. रविंद्र चव्हाण व नांदेड दक्षिणचे आ. आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नांदेड दक्षिण मतदारसंघाचे माजी आ.मोहन आण्णा हंबर्डे लोहा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शरद पाटील पवार गटनेते भास्कर पाटील पवार माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे माजी सभापती संजय पाटील कऱ्हाळे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कऱ्हाळे पुंडलिराव पाटील बोरगांवकर आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे स्वराज्य होम्सचे सुनिल पाटील शिंदे सह आदिंची उपस्थिती राहणार असुन पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन समस्त गांवकरी मंडळी पांगरी यांनी केले आहे.
