कुंडलवाडी (प्रतिनिधी श्रीनिवास नरावाड दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा)
येथील छावा मराठा संघटनेच्या वतीने शहरात छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या अश्वारुढ पुतळ्याची उभारणी करण्यात यावी अशी मागणी दि.११ फेब्रुवारी रोजी
नगराध्यक्षा सौ. प्रेरणाताई गजानन कोटलावार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
याप्रसंगी छावा मराठा संघटनेचे शहराध्यक्ष प्रा.डॉ. माधव हळदेकर, कार्याध्यक्ष डॉ.नरेश बोधनकर,उपाध्यक्ष करण समेटवार, सचिव दत्ता हमंद, सदस्य अनिल पेंटावार, विनोद काळेवार,राजेश कागळे,यांच्यासह गजानन कोटलावार,नगरसेवक रमेश इरलावार,संजय गोनेलवार,नगरसेविका सौ.अर्चना पोतनकर,भीम पोतनकर, शिव जायेवार, लखन नागुलवार,साईप्रसाद येपुरवार,गणेश कोडगीरे, साईनाथ धुसलवाड इत्यादींची उपस्थिती होती.
यावेळी नगराध्यक्षा सौ. प्रेरणाताई गजानन कोटलावार यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या पुतळ्याची उभारणी करून देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे
