वाशीम प्रतिनिधी – प्रताप नागरे
वाशिम, दि. १२ फेब्रुवारी : शहरातील राजनी चौक ते नगरपरिषद चौक या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या रस्त्यामुळे शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित, सुकर आणि सुलभ होणार असून व्यापारी, विद्यार्थी, नागरिक तसेच आपत्कालीन सेवांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शहराच्या दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा मार्ग आता अधिक दर्जेदार स्वरूपात नागरिकांच्या सेवेत उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होऊन विकासाच्या प्रक्रियेला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नगराध्यक्ष अनिल माधवराव केंदळे यांनी सांगितले की, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष कामांद्वारे बदल घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू असून, भविष्यातही अशाच विकासकामांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
