दै. चालु वार्ता, पैठण प्रतिनिधी, तुषार नाटकर-
छ. संभाजीनगर (पैठण):
पैठण : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त पैठण तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. समितीच्या अध्यक्षपदी किरण रमेशराव घाटविसावे यांची निवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी आदर्श दळवी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी चैतन्य बनकर व अमोल शेजुळ, सचिवपदी शुभम पैलवान, सहसचिवपदी शंकर नवगिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सहकोषाध्यक्षपदी किरण मगरे व आनंद बनकर यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यकारिणी जाहीर कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष राजू गायकवाड, अरुण बल्लाळ, भारत आठवले, स्वप्निल साळवे, गौरव आठवले, बंटी तुपे यांच्यासह अशोक पगारे, कपिल पहिलवान, प्रकाश निकाळजे, भास्कर दाभाडे, सुमित मगरे, रितेश पहिलवान, रवि मगरे, बाबा अडसूळ, महेंद्र साळवे, मनीषा आठवले, आकाश पगारे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. समितीच्या माध्यमातून भव्य मिरवणूक, व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
