बीडच्या जेलमधील ऑडिओ क्लिपवर मनोज जरांगे आक्रमक !
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कारागृहात असलेले आरोपी सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांनी कारागृहातील बंदीला क्षुल्लक कारणावरून अमानुष मारहाण केल्याचा दावा करणारी एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे.
यावरून खळबळ उडाली असून बीड जिल्हा कारागृहात काय सुरू आहे.असा सवाल उपस्थित केला जात आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली असा उल्लेख करण्यात आला आहे. या ऑडिओ क्लिपमधील वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून गोळ्या घालायचं लांब राहिलं तू फक्त मला बघून जा असे म्हणत जरांगे पाटलांनी थेट आव्हान दिले आहे,
बीड जिल्हा कारागृहातील बंदीची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. जेलमध्ये मारहाण झाल्याचे नातेवाईकांना सांगतानाची कॉल रेकॉर्डिंग न्यूज 18 मराठी च्या हाती लागली आहे. कारागृहामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीने मारहाण केल्याचा दावा या कॉलमध्ये केला आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, तू गोळ्या घालायला ये त्या दिवशी तुला मराठ्यांचा उद्रेक कळेल, पाय कुठे , मुंडके कुठे असणार आणि गोळा करायला कोणीच नसणार…
तू मला फक्त गोळ्या घालून दाखव… मनोज जरांगेंचा इशारा
मनोज जरांगे पाटील म्हणाले, गोळ्या घालायचं लांब राहिलं तू फक्त मला बघून जा… तू गोळ्या घालायला फक्त ये त्याचे दुष्परिणाम काय असतील हे तुला मग समजेल, हा माज आणि मस्ती आहे. आमचा समाजही मोठा आहे, उद्रेक कशाला म्हणतात, रक्त सांडलं कशाला म्हणतात हे आणखी एकदा संपूर्ण देश बघेल… तुझा पाय एकीकडे, हात एकीकडे आणि मुंडकं एकीकडे असं झालेलं दिसेल, तू मला फक्त गोळ्या घालून दाखव… तुझं कुणीही राहणार नाही आमची तेवढी मजबूत एकी आहे.
टोळीच्या म्होरक्याचेही तुकडे करणार : मनोज जरांगे
तुमच्याजवळ गोळ्या असतील तर मराठ्याजवळ ही गोळ्या आहेत. जर गोळ्या घालून आमची लोक मारणार असाल तर आमच्याकडे कुऱ्हाडी आहेत . तू ये तुला त्यादिवशी कळेल आणि तुझा लाभार्थी टोळीचा म्होरक्याही मरेल… तो कुठेही सापडू दे.. मुंबईला सापडू दे.. पुण्यामध्ये सापडू दे त्याचेही त्या दिवशी तुकडेच होणार तेही मराठाच करून दाखवणार आहे, मी मराठ्यांना संयमाने ठेवतो पण तुमची माज आणि मस्ती अशीच जर राहिली तर तुम्ही बियाला सुद्धा राहणार नाहीत.
बीड जिल्ह्यातील सगळ्या पोलीसांची बदली करा : मनोज जरांगे पाटील
बीडच्या जेलवर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मला बीड मधील गुंडाराज संपवायचा आहे. मग बीडमधील जेलर का बदलला, बीड जिल्ह्यातील सगळे पोलीस एकदा बदलून टाका.. बीडमधील सगळे महसूल सहित कर्मचारी एकदा बदला
