
दैनिक चालू वार्ता रायगड म्हसळा प्रतिनिधी -अंगद कांबळे
अलिबाग –
शिक्षक आमदार कपिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्य उपाध्यक्ष विनोद कडव सर आणि राज्य प्रवक्ते सतिष हुले सर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भारती चे रायगड जिल्हा शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल सह निवडणूक लढवणार, शिक्षक भारती ही रायगड जिल्ह्यात सर्व तालुक्यांत असलेली संघटना आहे, सर्व शाखांतील शिक्षक भारती चे शिलेदार तरुण व स्थानिक आहेत, जिल्ह्यात शिक्षक भारतीची केंद्र प्रमुख संघटना ही कार्यरत आहे, मागील डिसेंबर २१ च्या सानपाडा शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत सहकार पॅनल ला रायगड जिल्ह्यात भरघोस मत मिळून प्रतिसाद मिळाला होता, आमदार कपिल पाटील साहेब यांच्या कार्यप्रणालीवर विश्र्वास ठेवणारा शिक्षक वर्ग जिल्ह्यात असल्याने शिक्षक भारती रायगड जिल्ह्यातील आगामी शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत यश संपादन करणार असा ठाम विश्वास शिक्षक भारती चे जिल्हा अध्यक्ष श्री दिपक पाटील सर यांनी सांगितले.