
दैनिक चालु वार्ता दौंड प्रतिनिधी अरुण भोई
राजेगाव : राजेगाव (ता. दौंड) येथील विविध सेवा सहकार संस्थेच्या (सोसायटी) निवडणुकीत दोन पुरस्कृत पॅनेलचा दणदणीत पराभव करीत १३ पैकी ११जागांवर भाजप पुरस्कृत श्री राजेश्वर जनसेवा पॅनेलने विजय मिळवला, तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जय राजनाथ सहकार पॅनेलला फक्त दोन जागेवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार जनशक्ती पक्ष, असल्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्या तालुक्याचे लक्ष लागले होते. राजकारणातील चढता आलेख विरोधकांसह अनेकांना पाहायला मिळाला.
आगामी स्थानिक राजेश्वर संस्था सहकाराच्या निवडणुकीमध्ये एक- दुसऱ्याला दावेदारीच करता आली नाही पाहिजे, याच इर्षेने दोन्हीही बाजूने या निवडणुकीकडे पाहिले गेले सत्तेच्या वर्तुळातील जसे फायदे असतात तसेच तोटे असतात.
राजेगाव संस्थेतील विजयानंतर
जल्लोष करताना भाजप समर्थक.भाजप पुरस्कृत पॅनेलचे नेतृत्व करण यांनी विरोधकांची मूठ बांधून कोणताही गाजावाजा न करता, आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन संस्था चालवू हे पटवून देण्यात यशस्वी झाले.
विजयी उमेदवार : भाजप पुरस्कृत गोविंद कडू,अमोल मोरे ,राजेद्र खैरे,मयूर गुणवरे,मधुकर जाबले,भाऊ ढेंबरे,शरद मेंगावडे,
अनुसुचितजाती/ जमात विठ्ठल मोघे,महिला राखीव जयश्री मोरे,इतर मागास प्रवर्ग रमेश जाधव, भटक्या विमुक्त जाती संदीप टेंगले,