
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी-प्रा .मिलिंद खरात
पालघर जिल्हयातील वाडा तालुक्याच्या पालसई गावा मध्ये कोकणातील पहिले पहिले भव्य कृषी प्रदर्शन दिनांक 5 व 6 रोजी आयोजित केले आहे .
या प्रदर्शनात वाडा तालुका कृषी अधिकारी कार्यालय वाडा आणि एचडीएफसी आरगो आणि आत्मा यांच्या च्या संयुक्त विद्यमाने कृषी प्रदर्शन पालसई येथे स्टॉल मांडणी करण्यात आली. यावेळी एचडीएफसी आर्गोचे पिकविमा अधिकारी श्री.चेतन पाटील , श्री.हरिष बांगर बी टी एम (आत्मा), तालुका कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी वाडा कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.तसेच वाडा तालुका व पालघर जिल्ह्यातील अनेक शेतकरी यांनी स्वतःचे स्टॉल लावले होते .या प्रदर्शनाला अनेक शेतकरी व उद्योजक यांनी भेट दिली या कृषी प्रदर्शन 2022 आयोजन कृषी व्हेजचे श्री. किरण गोपाळ पाटील यांनी केले.