
दैनिक चालु वार्ता पिंपरी प्रतिनिधी-परमेश्वर वाव्हळ
महापालिकेच्या योजनेचा लाभ घेण्याचे आयुक्त राजेश पाटील यांचे आवाहन
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ब-याच मिळकती नव्याने उभारण्यात आल्या असून कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे काही नव्याने उभारण्यात आलेल्या मिळकतींची कर आकारणी झालेली नाही. कोरोना साथ रोगाच्या कालावधीमध्ये महा पालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे.ज्या मिळकतींची कर आकारणी झालेली नाही. आशा मिळकतींची कर आकारणी करण्यासाठी महापालिकेने धोरण निश्चित केले आहे महापालिका कार्यक्षेत्रातील ज्या नवीन अथवा वाढीव बांधकाम झालेल्या मिळकतींची कर आकारणी अत्यंत झाली नाही अशा मिळकतींची कर आकारणीसाठी जर मिळकत धारक स्वयंभू तिने स्वतः बांधकामाची नोंद करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने अर्ज करत असेल तर अशा नागरिकांना प्रोत्साहन व मिळकत करांमध्ये महापालिकेकडून ५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली आहे. योजना गेल्या वर्षी लागू केलेली असली तरी या योजनेचा पुढील टप्पा कार्यान्वित करण्यात आला आहे स्वतः आकारणी करून स्वतःची आकारणी अंतिम टप्प्यात पर्यंत नेणे या विषयातील महत्त्वाचे क्रांतिकारी पाऊल आहे लोकशाहीमध्ये लोकांना कुठल्याही प्रक्रियेत सहभागी करून घेणे हे महत्त्वाचे असते लोकांच्या विवेक बुद्धीवर विश्वास ठेवून प्रशासकीय यंत्रणा प्रतिसाद व गतिमान करण्याचे मोठे उद्दिष्ट गाठण्याचे हा एक महत्त्वाचा प्रयत्न असल्याचे राजेश पाटील यांनी सांगितले मालमत्ता कर हा नागरी संस्थासाठी उत्पन्नाचा स्रोत आहे नगरपालिका संस्था काही महत्त्वाच्या सेवासुविधा पुरवठा मालमत्ता कर हा महापालिका संस्थांना प्रदान करत असलेल्या सर्व सेवा सुविधांसाठी महसूल मिळवून देतो महानगरपालिका संस्थेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहे म्हणून अचल मालमत्तेच्या मालकांना करपात्र मूल्यावर कर भरणे अनिवार्य असते आणि मालमत्ता कर भरला नाही तर दे वसूल करण्यासाठी कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते महापालिका कार्यक्षेत्रातील इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १२७ व १२९ नुसार कर आकारणी करण्यात येते. तसेच अनुसूचित प्रकरण-८ नियम (१) अन्वये त्यात या आर्थिक वर्षातील प्रचलित प्रति चौरस फूट दराने मिळत नाही तर योग्य मूल्य निश्चित करण्यात येते सद्यस्थितीत पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये अनेक बांधकामे नव्याने झाल्याचे निर्देशनात आले आहेत. अशा मिळकतींची कर आकारणी होणे आवश्यक आहे. प्रशासकीय यंत्रणेत जलद प्रक्रियेसाठी व नागरिकांच्या करिता महापालिका मार्फत “माझी मिळकत माझी आकारणी” हि योजना राबविण्यात येत आहे. जर किती व कसा आकारला जातो याबाबत नागरिकांना माहिती नसल्याने होत नाही त्यामुळे रूपातून महापालिकेचे नुसकान होते सदर चे नुकसान टाळण्यासाठी व नागरिकांमध्ये कर भरणे बाबत जागृती करण्यासाठी “माझी मिळकत माझी आकारणी” ही योजना राबविण्यात येत आहे. कर किती व कसा आकारला जातो याबाबत नागरिकांना माहिती नसल्याने मालमत्तेची नोंदणी होत नाही त्यामुळे रूपातून महापालिकेचे नुकसान होते सदर चे नुकसान टाळण्यासाठी व नागरिकांमध्ये करण्याबाबत जागृती आणण्यासाठी माझी मिळकत माझी आकर्षण ठरणार आहे या योजनेद्वारे साध्या आणि सोप्या पद्धतीने स्वतःच्या मिळकतीची आकारणी करता येणार आहे एवढेच नाही तर कर आकारणी मान्य असल्यास लगेच भरता येणार आहे सदर कर भरल्यानंतर मोजमाप करण्यात येते आणि त्या सर्वेक्षणाच्या आधारे संबंधित अर्जानुसार कर आकारणी केली जाते या पद्धतीमध्ये जाणारा वेळ होणारी दिरंगाई टाळण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल महापालिका उचलत आहे मे-जून महिन्यात पथदर्शी स्वरूपात ही योजना राबविण्यात येणार आहे कर आकारणी न झालेल्या मिळकतींचे मिळकत धारक महापालिकेचे संकेस्थळावर अथवा स्वतः नोंदणीसाठी अर्ज करत असेल तर अशा मिळकती धारक नागरिक यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियम आतील कलम १४० मधील तरतुदीनुसार यापुढे नवीन कर आकारणी होणार या मिळकतीचे प्रकरणी या वर्षात कर आकारणी कायम होईल त्या आर्थिक वर्षाच्या चालू मागणीतील मिळकतकर दिला मधील सामान्य करात ५ टक्के पहिल्या वर्षाकरिता अटी व शर्तीच्या अधीन सवलत देण्यात येईल.