
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
जिवती :/- तालुक्यातील आदिवासी विविध सहकारी कार्यकारी संस्था जिवतीची निवडणूक नुकतीच पार पडली.
त्यात गोंडवाना गणतंत्र पार्टीचा दणदणीत विजयी प्राप्त करून काँग्रेस – राष्ट्रवादी च्या युतीचा सुफडा साफ करत गो. ग. पा. युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले,
ही निवडणूक गो. ग. पा. युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांच्या नेतृत्वात लढविण्यात आली.
विजयी उमेदवारांमध्ये सतलूबाई गोदरू पाटील जुमनाके, विठ्ठल केजगीर, ईश्वर मुस्ताफर, नामदेव भोजू जुमनाके, शंकूतला हनुमंत कुमरे, गोदाबाई जुमनाके, चिन्नू आडे, कर्नू कोडापे, जंगू मलकू कोटनाके, गणेश राठोड, बळीराम संभाजी खंबखाड, दुदम गणपती वाजगीर, विठ्ठल नेदेवाड यांचा समावेश आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंगजी जाधव, जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी, प्रदेश प्रवक्ते महेबूब शेख, जिल्हाउपाध्यक्ष निशिकांतजी सोनकांबळे, जेष्ठ नेते भीमराव जुमनाके, तालुकाध्यक्ष ममताजी जाधव, माजी सभापती भीमरावजी मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते मंगुजी मडावी, मारू पाटील नैताम, नगरसेवक जमाल्लूद्दीन शेख, क्रिष्णा सिडाम, नगरसेविका लक्ष्मीबाई जुमनाके, गो. ग. पार्टीचे कोरपना तालुका प्रसिद्धी प्रमुख संकेत कुळमेथे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे आणि विजयाचे शिल्पकार तथा गो. ग. पा. युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.