
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पिठेवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व युवा नेते चि रामचंद्र मासाळ यांची आज इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजपा ज्येष्ठ नेते माननीय श्री. हर्षवर्धनजी पाटील साहेब, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश जी भेगडे, इंदापूर तालुका अध्यक्ष शरद जामदार , इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज भाऊ जाधव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
रामचंद्र मासाळ यांनी खूपच कमी वयामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये युवकांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाळे निर्माण केले आहे ,आणि त्यांची युवक वर्गामध्ये वाढती असलेली क्रेझ व हर्षवर्धन पाटील साहेब यांचे अत्यंत विश्वासू यामुळे त्यांची इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी युवक मोर्चा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.
निवडीनंतर रामचंद्र मासाळ यांनी आपण इंदापूर तालुक्यामध्ये पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्य जनता ,युवक वर्ग त्यांच्यापर्यंत पोहोचवून पक्षवाढीसाठी इंदापूर तालुक्यामध्ये प्रयत्न करणार आहोत आणि आगामी येणाऱ्या सर्व निवडणुकीत युवक वर्गाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.