
दै.चालू वार्ता नांदेड प्रतिनिधी -प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
महाराष्ट्र राज्यातील विना तथा अंशत: अनुदानित शाळातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 100 टक्के वेतन देणे ही एकमेव मागणी तात्काळ मान्य करावी.
अन्यथा दि. 23/05/2022 पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन आमरण उपोषणा बाबत, अघोषित त्रुटी पात्र व अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दि. 15 नोव्हेंबर 2011 तसेच 24 जून 2014 तील वेतन अनुदान वितरणाचे सूत्र लागू करून पूर्ण 100% पगार सुरू करण्याबाबत चा अधिकृत शासन निर्णय दि. 22/05/2022 पर्यंत निघावा अन्यथा दि. 23/05/2022 पासून आझाद मैदान, मुंबई महाराष्ट्रातील विना तथा अंशतः अनुदानित हजारो शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितित बेमुदत धरणे आंदोलन / आमरण उपोषण करण्यात येईल अशा प्रकारचे निवेदन नांदेड जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी नांदेड शिक्षक समन्वयक प्रा. कैलाश खानसोळे, लोखंडे सी. बी. प्रा. शेख राजेसाब , प्रा. राजेंगोर आत्माराम, प्रा. खुरदामोजे एस. टी, प्रा. सुदर्शन फाजगे , प्रा. केंद्रे बी. एम. तसेच कदम पी. एम. प्रा.कैलाश जगताप, ढवळे एच. पी। श्री खडसे डी.के. सुर्यवंशी बी. टी. श्री जाधव ए. एम.जाधव ए. व्ही गायकवाड बी. एम.मोरे एस. के.मुरमुरे के. एस. , ठेम्बरे आर जी.प्रा. गच्चे एस. के. यासह जिल्ह्यातील असंख्य प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.