
दैनिक चालु वार्ता अर्धापूर प्रतिनिधी- मन्मथ भुस्से
महाविद्यालयीन जीवनात युवकांनी आपल्या जीवनामध्ये शिक्षण घेत डोळसपणे कार्य करावे, अंधश्रद्धा न बाळगता श्रद्धा बाळगावी परंतु अंधश्रद्धा कुठल्याही पद्धतीने बाळगू नये असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती कार्याध्यक्ष नांदेड जिल्हा ,श्रीनिवास यांनी व्यक्त केले. ते शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथील राज्यशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात व्याख्याते म्हणून बोलत होतो. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. के.पाटील हे होते. मंचावर कार्यक्रम अधिकारी तथा राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रघुनाथ शेटे ,डॉ.कविता केंद्रे मॅडम यांची उपस्थिती होती. याप्रसंगी श्रीनिवास पुढे बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्वक प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायला शिकलं पाहिजे. इथूनच आपल्याला खऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्त होते. जे ज्ञान प्राप्त होते ते निखळ असते. शिक्षण हाच खरा खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा दूर करणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी डोळसपणे शिक्षण घेऊन समाजातील अंधश्रद्धा दूर केल्या पाहिजेत.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. के. पाटील म्हणाले प्रत्येक विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्याचा प्रसार व प्रचार महाराष्ट्र भर केला पाहिजे. गावोगाव अंधश्रद्धा निर्मूलनासाठी चळवळ व्यापक केली पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. रघुनाथ शेटे यांनी केले तर आभार डॉक्टर केंद्रे यांनी मानले,या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो स्वयंसेवक ओंकार सिंगारे, प्रमोद भांगरे,कोल्हे ,गजभारे यांनी विशेष परीश्रम घेतले.