
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
नवी दिल्ली :- रस्ते सुरक्षेसंबंधित मुद्दयांवर एकत्रितपणे काम करण्यासाठी हितधारकांना जागृत करण्यावर केन्द्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिला भर दिला आहे. एनएचएआय/एमओआरटीएचने सेव्ह लाईफ फाऊंडेशनच्या (एसएलएफ) सहकार्याने सोमवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. रस्ते सुरक्षा हा अतिशय गंभीर विषय असून रस्ते अपघात अजिबात होऊ देता कामा नयेत असे ते म्हणाले. रस्ते सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून 2024 पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यू निम्म्याने कमी करण्याचे लक्ष्य ठेवल्याचेही त्यांनी सांगितले.
रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी सेव्हलाइफ फाऊंडेशनने मांडलेल्या विविध धोरणांचा आणि उपायांचा लवकरात लवकर विचार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश गडकरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
अपघातप्रवण जागांवर (ब्लॅकस्पॉट) तातडीने काम करायला हवे. तात्काळ उपाय, मध्यम काळासाठीची कार्यवाही आणि दीर्घकालीन कार्यवाही या तीन बाबी काम करताना लक्षात घ्यायला हव्यात. सर्व प्रादेशिक अधिकारी आणि प्रकल्प संचालकांनी शून्य अपघाताची शपथ घ्यायला हवी असे ते म्हणाले.