
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी -किशोर वाकोडे
बुलडाणा: दि.१०. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर बुलढाणा येथे तालुकाध्यक्ष संदीप लहासे बुलढाणा शहर अध्यक्ष मिलिंद वानखडे यांचे नेतृत्वात संपन्न झाले.
याप्रसंगी माननीय निलेश जाधव, विष्णू ऊबाळे, समाधान जाधव, ऍड. अमर इंगळे, नरवाडे काका यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. वंचित बहुजन आघाडी बुलढाणा तालुका व शहर शाखेच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते श्री द्या एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आठवणीत राहावा. त्या मोबदल्यात गरीब,बहुजन ,वंचिताची सेवा घडो.या उदात्त हेतुने तालुका अध्यक्ष संदीप लहासे व शहराध्यक्ष मिलिंद वानखडे यांनी बुलढाणा शहरामध्ये एक अनोखा उपक्रम घेऊन सर्वांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने साहेबांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रक्तदान शिबिर घेत असताना जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, जिल्ह्या महासाचिव विष्णू उबाळे, जिल्हा सचिव समाधान जाधव, जिल्हा विधी सल्लागार ऍड. अमर इंगळे, नरवाडे काका, शाहीर डी.आर. इंगळे,इत्यादी मान्यवरांनी बाळासाहेब हे बहुजनांचे नेते आहेत हे आपल्या भाषणातून व्यक्त केले.
बुलढाणा शहर अध्यक्ष संदीप लहासे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन तालुका महासचिव प्रशांत गवळी यांनी तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष मिलिंद वानखडे यांनी केले. या शिबिरात प्रसंगी प्रभाकर कळसकार, भीमराव डावकर, मिलिंद साळवे, सुमेध जाधव, सचिन गव ई, अंकुश घोडके, देवानंद खरात, किशोर सरकटे, पल्लवी वानखडे, अरुण सरदार,राजू वानखेडे, अनंता लहासे, दिलीप राजभोज,विजय राऊत, गजानन गवई, आकाश जाधव, समाधान गवई, विजय पवार, पिंटु खरात, अक्षय पार्वे, प्रांजली वानखडे, दिपक बावस्कर, शंकर मलबार यांच्यासह बहुसंख्य महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.