
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
मुंबई :- ‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवान्तर्गत’, दक्षिण मध्य क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्र, नागपूर; जिल्हा प्रशासन, कोल्हापूर; आणि राजर्षी शाहू फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.14 व 15 मे 2022रोजी , इथे ‘छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळ्याचे ‘ आयोजन करण्यात आले आहे. येत्या 14 मे 2022 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता, शाहू मिल, उद्यम नगर, कोल्हापूर इथे पालकमंत्री सतेज (बंटी) पाटील आणि श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होईल .
‘छत्रपती संभाजी महाराज जयंती’ आणि ‘राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी’निमित्त आयोजित या कार्यक्रमात 9 राज्यांतील पारंपरिक नृत्ये व लोकनृत्ये सादर केली जाणार आहेत. या जोशपूर्ण कलाकृतींमध्ये पोवाडा, धनगरी गजा, सोंगी मुखवटे, लावणी (महाराष्ट्र), गुदुम बाजा (मध्य प्रदेश), पंथी नृत्य (छत्तीसगढ़), भांगडा नृत्य (पंजाब), रौफ नृत्य (कश्मीर), सिद्दी धमाल (गुजरात), बिहू नृत्य (आसाम), घुमर नृत्य (हरियाणा) और हालाकी सुग्गी कुनिथा (कर्नाटक) यांचा समावेश आहे. या सोहळ्यात एकूण 200 लोकनृत्य कलावंत सहभागी होत आहेत.
या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रेक्षकांनी याचा आनंद लुटावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.