दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
आगरतळा : त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ डॉ.माणिक साहा यांनी घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले साहा मागील महिन्यातच राज्यसभेवर निवडून गेले होते.
केवळ सहा वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या साहा यांना मुख्यमंत्रिपद दिल्यानं नाराजी उफाळून आली आहे. असं असलं तरी साहा यांना मात्र, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीआधीच ते मुख्यमंत्री होणार हे माहिती होतं. खुद्द साहा यांनीच याची कबुली दिली आहे.


