
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई: पावसाची आतुरतेनं वाट पाहात असतो. तो मान्सून अखेर दाखल झाला आहे. अंदामानात मान्सून दाखल झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून अंदमानात 22 मे रोजी दाखल होणार होता.
मात्र यंदा हा मान्सून सहा दिवस आधीच म्हणजे 16 मे रोजी दाखल झाला आहे. हवमान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र केरळमध्ये सुध्दा मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे.
यंदा केरळमध्ये मान्सून 27 मे रोजी दाखल होण्याची दाट शक्यता आहे. पुणे वेधशाळेचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहिती नुसार, महाराष्ट्रात किंवा मुंबईत मान्सून कधी येईल हे अद्याप सांगता येणार नाही. मात्र देश पातळीवर एकूण मान्सूनचा विचार केल्यास सरासरीच्या 99 टक्के पाऊस असेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.