
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- माधव गोटमवाड
कंधार -लोहा मतदार संघाचे माजी आमदार भाई डॉ. केशवराव धोंडगे यांचे कर्तव्यदक्ष कनिष्ठ सुपुत्र असलेले भाई प्रा.डाॅ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय व आरोग्य विषयक आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले कोरोना काळात रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोफत भाऊचा डब्बा उपक्रम राबविला अनेक डॉक्टरांना मोफत किट वाटप केले माजी आमदार भाई केशवराव धोंडगे यांच्या शतकोत्तर जन्म शताब्दी महोत्सव कार्यक्रम अंतर्गत शलेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करणे, श्री संत गाडगे महाराज विद्यालयाच्या नुतन विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करणे गोरगरीबांना मदत करणे आदी सामाजिक उपक्रम राबविले आहेत.
श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष मा. जि.प. सदस्य प्रा.डाॅ. भाई पुरुषोत्तम धोंडगे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.३१ मे रोजी घोडज येथील श्री.शिवाजी प्राथमिक शाळा व गुरुकुल पब्लिक स्कूल घोडज येथे प्रवीण पा. लाडेकर यांच्या नियोजना खाली शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्यात वही,पेन, कलर बॉक्स,पुस्तके , स्केलपट्टी व इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून घोडज चे उपसरपंच प्रतिनिधी आत्माराम पा. लाडेकर होते .सूत्रसंचालन सचिन गोरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रवीण पाटील लाडेकर सरांनी केले.
यावेळी उपस्थित गुरुकुल पब्लिक स्कूल घोडज व कंधार चे संचालक सुनील राठोड सर,ज्ञानेश्वर लाडेकर सर, चव्हाण सर,माधव गोटमवाड सर,उषा लाडेकर मॅडम , शिवनंदा लाडेकर मॅडम व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.