
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे : शहरात रविवारी झालेल्या “पुणे प्लॉगेथॉन 2022′ मेगा ड्राईव्ह अंतर्गत एकूण १ लाख ३६२९४ नागरिकांनी आपला सहभाग नोंद केल्या मुळे पुणे शहराने एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये विक्रमी नोंद केल्याचा दावा करण्यात आला आहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नागरिकांनी प्लॉगेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आपले ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले होते.
महापालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयातर्गत एकूण १३४ रस्ते, विविध वारसा स्थळे, शहरातील एकूण ४५ उद्याने, टेकड्या, विविध नदी घाट इ. ठिकाणी “प्लॉगेथॉन ड्राइव्ह’ राबवण्यात आला.या उपक्रमाची सुरूवात महापालिकेच्या मुख्य इमारतीतून करण्यात आली. यावेळी कॉन्सुलेट जनरल ऑफ स्वीडन इन महाराष्ट्र अॅन्ड गोवाचे ऍना लुटविक, खासदार अॅड. वंदना चव्हाण, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विलास कानडे, पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, “यशदा’चे उपसंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आदि मान्यवर उपस्थित होते.