
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी .
सातारा जिल्ह्यांतील कोरेगांव तालुक्यांतील भोसे येथील सैन्य दलातील जवान विपुल दिलीप इंगवले वयांच्या २५ वर्षी सियाचीन मध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलेची माहिती कोरेगांव तालुक्यांसह भोसे गावासह पंचकोशीवर शोककळा पसरली. सामान्य कुटुंबातील विपुल इंगवले यांनी गावातच माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या कोरेगांव येथील डी. पी भोसले कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले १६ मे २०१६ मध्ये ते सैन्य दलांत सिंगल रजिंस्टरमेंट मध्ये भरती झाले. गोवा येथे प्रशिक्षण पूर्ण करुन त्यांची पहिली पोस्टिंग त्यांची पंजाब मध्ये झाली दोन वर्षापूर्वी पासुन ते सियाचीन मध्ये कर्तव्य बजावत होते. विपुल इंगवले हे कर्तव्यांवर असताना बर्फच्या वादळात ते गंभीररीत्या जखमी झाले होते त्यांच्यावर सुरुवातीला सैन्यदलांच्या स्थानिक रुग्णालयांत उपचार करण्यांत आले तिथून दिल्ली ते उपचार करण्यांत आले कुटुंबाच्या दृष्टीने पुणे येथील सैन्य दलांच्या कमांडो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यांत आले मात्र उपचारादरम्यांन रविवारी सायंकाळी जवान विपुल इंगवले यांच्या शरीरांने साथ दिली नाही आणि रविवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी सकाळी त्यांच्यावर त्यांच्या भोसे या मूळगावी शासकीय इतमामांत सैन्यदलांच्या जवानांकडूंन हवेत गोळ्यांचा बार करीत अखेरची मानवंदना देवुन शहीद जवान विपुल इंगवले यांना अखेरचा निरोप देण्यांत आला यावेळी भोसे गावचे सरपंच गणेश भोसले व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सहकारी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण भोसे गावात रांगोळीचा सडा गावच्या प्रत्येक चौका चौकात श्रद्धांजली अर्पण करणारे फलेक्स लावण्यांत आले होते विपुल इंगवले यांचे पार्थिंव गावात दाखल होताच प्रथम त्यांच्या घरासमोर अंत्यदर्शनासांठी ठेवण्यांत आले यावेळी विपुल इंगवले यांच्या आई वडील दोन बहिणी व एक भाऊ यांच्यासह त्यांच्या पत्नीने एकच आक्रोंश केला यावेळी उपस्थिंतीना सुद्धा अश्रूं अनावर झाले त्यानंतर इंगवले यांचे पार्थिंव सजवलेल्या ट्रॉलीमध्ये ठेवून त्यांची संपूर्ण गावातून अंत्ययात्रा काढण्यांत आली. यावेळी शहीद जवान यांच्या पार्थिंवाचे अंत्यदर्शन घेण्यासांठी सातारा जिल्ह्यांतील राजकीय सामाजिक, धार्मिक मान्यवर मंडळींनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. यावेळी मा.खासदार श्रीनिवास पाटील , विधान परिषदेचे मा.आमदार शशिकांत शिंदे, विधान परिषदेचे मा. आमदार महेशजी शिंदे यांच्यासह कोरेगांवचे तहसिलदार मा.अमोल कदम, प्रांतअधिकारी ज्योती पाटील मॅडम, कोरेगाव विभागांचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे मॅडम कोरेगांव पोलीस स्टेशनचे कर्मचारी भोसे गावचे पोलीस पाटील पंचक्रोशींतील ग्रामस्थ मित्र परिवार यांनी भारत माता की जय ,अमर रहे, अमर रहे विपुल इंगवले अमर रहे अशा घोषणांचा गजर करीत शहीद जवान विपुल इंगवले यांना अखेरचा निरोप दिला विपुल इंगवले यांच्या पश्चांत वीर पत्नी सात महिन्यांची कन्या, आई-वडील दोन बहिणी व एक भाऊ असा त्यांचा परिवार होता.