
दैनिक चालू वार्ता आर्णी प्रतिनिधी-श्री. रमेश राठोड आर्णी
(बेलदार समाजातील युवक बनला डॉक्टर)
सावळी सदोबा:–आर्णि तालुक्यातील अतिदुर्गम व माळराण पठारावर वसलेल्या माळेगांव सारख्या लहान खेडेगावातून सामान्य कुटुंबातील अभिजीत गोविंदराव बढीये यांनी श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे वैद्यकीय परीक्षेत यश संपादन करून माळेगांव सारख्या छोट्याशा गावाचं नावलौकिक केलं,दगड व मातीचे काम करणारा बेलदार समाजात जन्मलेल्या, अभिजीतची कुटुंबाची परिस्थिती सामान्य असताना,अभिजीत लहान असतानाच वडीलांचे मोटरसायकल अपघातामध्ये निधन झालेत,कुटुंबाचा कमावता पुरुष गेल्याने कुटुंबावर खूप मोठे संकट कोसळले,कुटुंबात आई दोन बहिणी व अभिजीत,कुटुंबाचा कमवता माणूस गेला असतांना,आपल्या तिन्ही मुलांना वडिलांची कमी न भासु देतात,कुठेही न डगमगता, निर्भीडपणे कुटुंबाची जबाबदारी विधवा आईने स्वीकारली आणि आपल्या तिन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन मुलांच्या शिक्षणात कुठेही कमी पडू दिली नाही,त्यातच फळ म्हणून दोन्ही मुली इंजिनिअर व मुलगा अभिजीत आज,एमबीबीएस डॉक्टर झाला आहे, आर्थिक प्रस्थितिवर मात करीत आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवत मार्गक्रमण केले,जिद्द,चिकाटी,ध्येय डोळ्यासमोर ठेवून अभिजीतने आज यशोशिखर गाठले,कठीण परिस्थितीवर ही मात करून यश संपादन करता येते हा आदर्श अभिजीत गोविंदराव बढीये यांनी ग्रामीण भागातील युवकांपुढे निर्माण केले आहे