
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर–
देगलूर तालुक्यातील वाळू घाटाचे नियमानुसार तीन ब्रास वाळू एका टिप्पर मध्ये असणे बंधनकारक आहे मात्र नियमाची पायमल्ली करत सहा ब्रास पेक्षा अधिक वाळूची वाहतूक करण्यात येत आहे
आपल्या कार्यालयातील पथक काम करत असताना पथकांनी एका इंनवोईस नंबर ची नोंद करून चार गाड्या सोडून देत आहे त्यांची नोंद घेत नाही तरी दंडात्मक कडक कारवाई करावी सगळ्या गाड्या ची सी.सी. टिव्ही कॅमेरा निगराणी ठेवून चौकशी करण्यात यावे सुरु असलेल्या अधिकृत वाळू ठेकेदाराकडून नियमाचे उल्लंघन करून शासनाच्या सर्वच नियमांना धाब्यावर बसून वाळूचा उपसा व वाहतूक केली जात असून पाच हजार रुपये ब्रास वाळू विक्री केली जात आहे व ग्राहकांची फसवणूक व लूट केली जात आहे वाळू घाटावर मजुरांच्या साह्याने वाळूउपसा होणे आवश्यक आहे असे असताना संबंधी ठेकेदारांनी पोकलेन जेसीबी सारख्या यंत्रांच्या सहाय्याने वाळू उपसा केला जात आहे वाळू घाटावर सी.सी टीव्ही बसवण्यात आलेले नाही
नियमानुसार सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वाळू उपसा चालू असावा परंतु रात्रभर जेसीबी द्वारे वाळू उपसा होत आहे
तात्काळ सदरील होणारे अवैध रेती उपसा करणारे गुत्तेदार यांच्याविरुद्ध त्वरित चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी असे निवेदन मा. सहाय्यक जिल्हाधिकारी सोम्या शर्मा यांना अजीम अन्सारी यांनी दिले आहे