
दैनिक चालु वार्ता पिंपरी प्रतिनिधी-परमेश्वर वाव्हळ
पुणे: महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघाचे पहिले त्रैवार्षिक अधिवेशन विश्वकर्मा भवन,पुणे येथे संपन्न झाले. या अधिवेशनासाठी
प्रमुख पाहुणे म्हणुन भारतीय मजदुर संघाचे प्रदेश पदाधिकारी श्री.चंद्रकांत धुमाळ केंद्रीय प्रभारी व सुरक्षा रक्षक, श्री.मोहन येणुरे प्रदेश सरचिटणीस, महासंघाचे ॲड.विशाल मोहिते प्रदेश सरचिटणीस व प्रदेश अध्यक्ष संदीप पाटील, प्रदेश उपाध्यक्ष शंभू खंडाळे,प्रदेश सचिव गणेश लांडगे, पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर विभाग प्रमुख किरण पवार आणि प्रदेश मीडिया प्रमुख सागर रूपटक्के हे उपस्थित होते.
या अधिवेशनासाठी जिल्ह्यातून शंभर सुरक्षा रक्षक उपस्थित होते.तसेच अधिवेशनात मागील चार वर्षांतील कार्य अहवाल प्रदेश सरचिटणीस यांनी निवेदन देऊन सर्वांना वाचुन दाखवला.
तसेच सदर अधिवेशनात पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड कार्यकारिणी गठित करण्यात आली. नवनियुक्त अध्यक्ष युवराज नाळे,सचिव तुकाराम कुंभार,संघटनमंत्री मनोज पवार,मीडिया प्रमुख परमेश्वर वाव्हळ, पिंपरी चिंचवड अध्यक्ष राजकुमार काळे, सयाजी कदम यांची निवड करण्यात आली अशी माहिती सुरक्षा रक्षक महासंघाचे अनिल पारधी व अविनाश मुंढे यांनी दिली आहे.