
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा–
एक गाव एक समशान भूमी असलेल्या नांदगाव नगरीत
नांदगाव चे सामाजिक कार्यकर्ते श्री वैजनाथ भालेराव यांनी आपला वाढदिवस हा चक्क स्मशानभुमीत टरबुज कापुन साजरा केला.हा वाढदिवस साजरा करुन तरुणांची स्मशानभुमी बद्दलची दृष्टीच बदलुन टाकली.
स्मशानभुमीतली भिती पळवुन लावण्यासाठी हा वाढदिवस साजरा केल्याचे सांगण्यात आले.
स्मशानभुमीतला हा पहिलाच वाढदिवस दिवस लोकांचे लक्ष वेधत आहे
स्मशानभुमीत वाढदिवस साजरा तर केलाच वरून पुन्हा सामाजिक कार्यात असल्याने आपल्या जन्मदिनी स्मशानभुमी च्या सुशोभीकरणासाठी २०००/ रुपयांचे झाडांचे पालण करण्यासाठी ठिबकचे साहित्य भेट देणार असे आश्वासन दिले
आणि जेवढं शक्य तेवढे श्रमदान करण्याचे सांगितले.
हा जन्मदिन साजरा करताना सरपंच ज्ञानेश्वर भालेराव, सदस्य विठ्ठल भालेराव,एकनाथ महाराज भालेराव , कैलास भालेराव ,व मोठ्या प्रमाणात मित्रवर्य होते.