
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-प्रदिप मडावी
चंद्रपूर–
शिक्षणाची संधी शोधणारा व्यक्ती शासन-प्रशासन व प्रस्थापित व्यवस्थेला नाचवू शकतो. समाजातील युवकांना आज उदयोन्मुख, स्पर्धात्मक, व्यावसायिक व क्रांतिकारक, महापुरुषांच्या जिवनाचा आदर्श घेणाऱ्या शिक्षणाची गरज आहे. आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित सांस्कृतिक महोत्सव हा प्रशासनाचा पोटभरू व्यवसाय होत असल्याने अशा आयोजनाला विरोध केला पाहिजे. मुळवंशिय समुदायाच्या पोटजमात सोडा समाज जोडा या गोंदोला उपक्रमाअंतर्गत सर्वांगसुंदर अशा उपवधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले.अशा उपक्रमांमधून समाज जोडण्याचे काम निश्चितच होणार आहे.आज विविध समस्या उभ्या असल्यातरी आभाळ फाटलं आहे म्हणून स्वस्थ बसण्यापेक्षा त्याला ठिगळं लावण्याचे काम आम्हा नेतृत्वालाच हाती घ्यावे लागेल.असे विचार गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्थेचे सचिव बापुराव मडावी यांनी गोंडपिपरी येथिल मेळाव्याच्या अध्यक्षीय भाषणातून समाजबांधवां समोर मांडले.
ग्राम आरोग्य सेना फाउंडेशन च्या वतीने गोंदोला उपक्रमाअंतर्गत खैरे कुणबी सभागृहात आयोजित मेळाव्याचे उद्घाटन सेवा निवृत्त शिक्षक भाऊरावजी कोटनाके यांचे हस्ते झाले.मंचावर प्रमुख मार्गदर्शक मनोजसिंह गोंड मडावी, प्रमुख अतिथी गोंडवाना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गजानन गोदरू पाटिल जुमनाके, आदिवासी सेवक पिसाजी कुळमेथे,आदर्श शिक्षक डॉ.मधुकर कोटनाके, रविंद्र कोवे महाराज,गोंडीयन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकरजी कन्नाके,गोंदोला समुहाचे मुख्य संयोजक डॉ.प्रविण येरमे, डॉ.शारदा येरमे,गोंडपिपरी न.प. नगरसेविका कु.मनिषा मडावी,सौ.अश्विनी तोडासे,कोलाम समाजातील पहिले इंजिनिअर बालाजी मडावी, आफ्रोट चे जिल्हाध्यक्ष विजय कुमरे, संतोष तलांडे,जगन येलके, आनंदराव कोडापे विराजमान होते.
या वेळी मंचावरील लोककलावंत रमेशजी आत्राम व मुळवंशिय मैंरेज ब्युरोच्या माध्यमातून अनेकांच्या रेशिमगाठी बांधणारे लक्ष्मणजी सोयाम सर यांचा शाल, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गोंदोला समुहाच्या वतीने समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.मेळाव्यात विदर्भातील अनेक जिल्ह्यांतून आलेल्या उपवधू-वरांनी आपला परिचय सादर केला. डॉ.सफल कोटनाके व सौ.प्रिया कोटनाके यांच्या विवाहाचे औचित्य साधून आयोजित मेळाव्यात मुळवंशिय समुदायाच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे गोंडीनृत्य,गोंडीभजन व मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले.
प्रास्ताविकेतून डॉ.प्रविणजी येरमे यांनी ग्राम आरोग्य सेना व गोंदोला उपक्रमाचा आणि या मेळाव्याच्या आयोजनाचा उद्देश विशद केला. उत्कृष्ट संचालन प्रा.महेश गेडाम यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.निरज आत्राम यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्राम आरोग्य सेना रूग्णसेवक व विद्यार्थी सेवक संजय सोयाम, लक्ष्मण कुळसंगे, मेजर बंडूजी कुमरे, प्रविण मडचापे,मंगेश सोयाम, डॉ.प्रमोद परचाके,नागो मेश्राम,कु.मयुरी तलांडे, संकेत कुळमेथे, मंगेश पंधरे यांनी परिश्रम घेत मेळावा यशस्वी केला.