
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
श्री संत शंकरस्वामी महाराज संस्थान शिऊर फडाचा अखंड हरिनाम सप्ताहाची तयारी वेगात
उपाध्यक्ष सारंगधर महाराज भोपळे यांच्यासह विश्वस्त व सप्ताह समितीच्या सदस्यांची विविध गावात भेट
वारकरी संप्रदायातील केंद्रबिंदू असलेले शिऊर येथील श्री संत शंकरस्वामी महाराज संस्थान फडाचा २७७ वा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी स्वामींच्या समाधी स्थळाच्या आवारात होत आहे, २ ते ९ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या सप्ताहात ज्ञानदान व अन्नदान मोठ्या प्रमाणात होणार आहे.
रोजच्या अन्नदानासाठी वैजापूर, गंगापूर, कन्नड , नांदगाव तालुक्यातील तब्बल ११० गावातून भाकरी येणार आहे तर हजारो लिटर आमटी सप्ताहस्थळी करण्यात येणार आहे.
आमटी साठी मोठे चुलांगण तयार करण्यात येत आहे तर १००× ६० आकाराचा चा भोजण मंडप असणार आहे.
सप्ताह कालावधीत विविध गावातील नागरिकांनी अन्नदानासाठी भाकरी पाठवाव्यात तसेच या सप्ताह मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी संस्थानचे उपाध्यक्ष सारंगधर महाराज भोपळे, विश्वस्त रामभाऊ महाराज मगर, कचरू पाटील जाधव, प्रभाकर आढाव, शिवाजी साळुंके,नारायणराव सुर्यवंशी, गोविंदराव जाधव, कारभारी जाधव, विश्वनाथ साळुंके, शिवाजी जाधव,भागा नाना टुणकी, कैलास आप्पा जाधव, जालींदर जाधव आदींनी विविध गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांसोबत संवाद साधला.
या सप्ताह समाप्तीच्या दिवशी एक लाखावरून आधिक भाविक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज संस्थानचे अध्यक्ष एकनाथराव जाधव , सचिव बबनराव जाधव यांनी व्यक्त केला.
दरम्यान काल्याचे कीर्तन व महाप्रसाद वितरण जय बालाजी आदिवासी आश्रम शाळेसमोरील मैदानावर होणार आहे. या सप्ताहमध्ये जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन संस्थानने केले आहे.