
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली – चीनकडून लडाखजवळ निर्माण करण्यात येणार्या पायाभूत सुविधा धोकादायक आहेत, अशी चेतावणी ‘यूएस् आर्मी पॅसिफिक’चे अधिकारी जनरल चार्ल्स फ्लिन यांनी दिली.
चीनची ही कृती या भागात अस्थिरता निर्माण करणारी असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘येथे चीन ज्या गतीने सैनिकी शस्त्रागार उभारत आहे, त्याचे नेमके कारण काय ?’, असा प्रश्न कुणालाही पडेल. चीनविरुद्ध आपण एकत्र काम करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.