
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
जन्मापासून शेवटच्या क्षणा पर्यंत क्षणोक्षणी आपल्या मना मध्ये अनेक इच्छा, आकांक्षा, महत्वकांक्षा जन्म घेत असतात. आणि त्या पुर्ण करण्यासाठी आपण पुर्ण ताकदीने यथा अवकाश प्रयत्न सुद्धा करत असतो . परंतु हे प्रयत्न करत असताना आपण जर दुरदृष्टी ठेवून प्रयत्न केले तर परिणाम अगदी सुयोग्य येतात .आणि आपण जर दुरदृष्टी न ठेवता प्रयत्न केले तर मग मात्र आपल्याला अन अपेक्षित परिणामांना सामोरे जावे लागते. एकंदरीत आपल्या इच्छा,आकांक्षा, महत्त्वाकांक्षा पुर्ण होताना येणारे परिणाम हे त्या त्या वेळी आपण ठेवलेल्या दुरदृष्टी वरच अवलंबून असतात.दैनंदिन जीवन जगत असताना अनेकदा आपल्याला अनेक चांगल्या, वाईट, अपेक्षित अनपेक्षित घटनाक्रमांना तसेच परिणामांना समोरे जावं लगात . आणि यावेळी आपली दुरदृष्टी कशी आहे. त्यावर अनुभुती ला येणारे परिणाम हे तात्कालीन परिस्थितीमध्ये घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असतात . दुरदृष्टी हि जीवनातील खुप महत्वपूर्ण बाब आहे . दैनंदिन जीवन हे अंखडित संकटांची मालिका असते.नविन दिवस उगवला कि नविन संकटं, समस्या, नविन आव्हान, नियमित चालू असते. .या पृथ्वीवर असा कुणाही व्यक्ती नाही कि ज्याच्या जीवनामध्ये दैनंदिन समस्या, संकटं अडचणी आव्हान नाहीत . मात्र त्याच गांभीर्य हे कमी जास्त प्रमाणात असु शकत. संकटं,वादळ, अडचणी,ह्या येणारच मग आपण गरीब असो कि श्रीमंत असो ज्ञानी असो वा अज्ञानी असो सर्वसाधारण व्यक्ती असो किंवा महान व्यक्तिमत्त्व असो . आपण ज्या प्रवर्गात मोडतो त्यानुसारच आपल्या आव्हानांच स्वरूप असतं .तसेच आपल्या जीवनातील समस्या , अडचण वादळ, आव्हान हे व्यक्तिगत असो किंवा सार्वजानिक असो , त्याच प्रमाणे आपण आपल्या जीवनातील वयोमानानुसार वेगवेगळे टप्पे जेव्हा पुर्ण करत असतो .तेव्हा मात्र त्या त्या टप्यावर वळणावर आपल्याला येणारे जे अडथळे आहेत ते अडथळे आल्यानंतर आपल्या कडे असणारी दूरदृष्टी हि त्या अडथळयाचे परिणाम बदलते . आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील करिअरमध्ये जसं सांस्कृतिक ,कला, क्रीडा, उद्योग, व्यवसाय नोकरी ,रोजगार ,स्वयंरोजगार, समाजकारण-राजकारण , आध्यत्मिक तसेच इतर कुठल्याही सेवा क्षेत्रा मध्ये कार्य करत असताना.एकंदरीत कुठलंही क्षेत्र असु द्या . त्या मध्ये अडथळ्यांची शर्यत हि पार करतच पुढे जावं लागतं.क्षणा क्षणाला टप्या टप्यावर आव्हान हि येणारच अडथळ्यांची शर्यत पार पाडतच प्रवास करायचा असतो . आणि यावेळी ब्रह्म अस्त्र म्हणून कामी येते ती आपली दुरदृष्टी ती आपल्या कडे असेल तर आपण कुठलेही अडथळे पार करणारच आणि दुरदृष्टी नसेल तर मग मात्र आपण अडथळे पार करू शकणार नाहीत. बिना अडथळयाच पुढे जाणारे लोक अपवादात्मक असतात. खुप कामी लोकांना बिना अडथळयाच पुढे जाता येत . किंवा त्यांच्या जीवनात कुठलिही समस्या अडचण, वादळ नसतं.असे अगदी नाममात्र लोक आहेत . परंतु बहुतांश लोकांना जीवनातील अडथळ्यांची शर्यत पार करत असतानाच वेळोवेळी वेगवेगळ्या टप्प्यावर विविध संकटांना समस्यांना सामोरे जावाच लागते . म्हणून सामोरे जात असताना आपण दुरदृष्टी दाखवू शकलो तर आपल्या जीवनामध्ये भविष्यात त्याचे अति उत्कृष्ट किंवा सर्वोत्तम परिणाम मिळणारच म्हणून तात्कालीन परिस्थितीमध्ये दूरदृष्टी ठेवताना जरी त्रास वाटत असला .तरीही दूरदृष्टीचे परिणाम अत्यंत सुयोग्य असतात .म्हणून दूरदृष्टी ही आपल्या जीवनातील चांगल्या वाईट परिणामांची जणणी असते . म्हणून दुरदृष्टी ठेवा आणि आपल्या जीवनातील सुयोग्य चांगल्या परिणामांचा आस्वाद घ्या
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301