
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री,रमेश राठोड
सावळी सदोबा:-आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा परिसरात पावसाने चांगलेच झोडपून काढले असून, सतत चालणाऱ्या पावसाने आक्रमक रूप धारण केले असून,नदी,नाल्याला पूर आल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरल्याने पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे,चार दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्याने नदी नाल्याला पुराचे प्रमाण वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे सावळी सदोबा येथील दोन्ही गावाच्या मधोमध असलेल्या नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने पुराचे पाणी घरात शिरल्याने अनेक कुटुंबांना रात्रभर घराबाहेर राहावे लागले, घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य भिजल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे,सकाळपासून पाण्याचा जोर वाढतच असल्याने जगायचे कसे असा प्रश्न सर्वसामान्यात पुढे उभा टाकला आहे..? शेतमजुराला पाच दिवसापासून हाताला काम नाही पोट भरायचे तरी कशी असा प्रश्न पडला आहे अनेक दिवसापासून शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत होता, दुबार,तिबार,पेरणी करून कसेबसे उगवलेले पीक ते सुद्धा पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यापुढे मोठा प्रश्न उभा झालेला आहे दरवर्षी नापिकीचे साल त्यामध्ये पुराने वाहून गेलेली शेती आता जगायची तरी कशी असा प्रश्न शेतकरी,शेतमुजरा समोर उभा आहे, शासनाने तत्काळ पंचनामा करून शेतकऱ्याला तात्काळ मदत देण्यात यावी,मजुराला कोणत्यातरी माध्यमातून त्यांना सुद्धा मदत करण्यात यावी ज्यांचे घर पाण्याखाली गेली त्यांना सुद्धा तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी सावळी सदोबा परीसरातु होत आहे